लवासा प्रकरणात पवार कुटुंबाला दिलासा; पण मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ आणि अजित पवारांविरुद्ध फास आवळला!!

लवासा प्रकरणात कुटुंबाला दिलासा; पण मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ आणि अजित पवारांविरुद्ध फास आवळला!!, हे चित्र आज समोर आले. Pawar family

लवासा जमीन घोटाळा प्रकरणात शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आपापल्या पदांचा गैरवापर करून तिथे घोटाळा केला त्या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी, अशी याचिका नाशिकच्या नानासाहेब जाधव यांनी मुंबई हायकोर्टात केली होती त्यावरून हायकोर्टाने संबंधितांविरुद्ध पुरेसे पुरावे नाहीत याचिकाकर्ते तवढे पुरावे समोर आणू शकले नाहीत म्हणून याचिकाकर्त्यांची मागणी मान्य करता येत नाही, असा निकाल मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांनी दिला. याचा अर्थ पवार कुटुंबाला न्यायालयातून लवासा प्रकरणात दिलासा मिळवावा लागला.

– पार्थच्या जमीन घोटाळ्यातले आणखी पुरावे बाहेर

पण त्याच वेळी पार्थ आणि अजित पवार यांच्या विरोधात मुंढवा जमीन घोटाळ्यातले अनेक पुरावे आजच समोर आले. शितल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यामध्ये 2019 पासूनच मुंढव्यातल्या जमिनीचा व्यवहार सुरू होता. त्यामध्ये अजित पवारांच्या तीन ओएसडींनी मदत केली. त्यांचे मोबाईल चॅट्स पकडले गेले. पॉवर ऑफ ऍटर्नी करण्यापासून ते प्रत्यक्ष व्यवहार पूर्ण करण्यापर्यंत सगळीकडे अजित पवारांना सगळे माहिती होते त्यामध्ये पुण्यातल्या अधिकाऱ्यांनी सगळ्यांना मदत केली. याचे कायदेशीर कागदोपत्री पुरावे अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. अजित पवारांचा राजीनामा घेतला नाही, तर न्यायालयात जाऊन पार्थ पवार विरुद्ध FIR दाखल करण्यासाठी अर्ज करू, असा इशारा अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.



शितल आणि दिग्विजयच्याच वकिलांनी दिली कागदपत्रे

त्यामुळे एकीकडे लवासा जमीन घोटाळ्यात पवार कुटुंबाला मुंबई हायकोर्टातून दिलासा मिळवावा लागला, पण त्याच वेळी पार्थ आणि अजित पवार यांच्या विरोधात कायदेशीर पुराव्यांचा फास्ट आवळला गेला. विशेष म्हणजे या कायदेशीर पुराव्यांची कागदपत्रे शितल तेजवानी आणि पार्थ पवारच्या मेडिया कंपनीचा 1 % भागीदार दिग्विजय पाटील यांच्याच वकील तृप्ता गुप्ता यांनी अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांना पाठविली. मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारला वाचविण्यासाठी फक्त शितल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांना अडकविल्याचा संशय वाढल्याने त्यांच्या वकिलांनी आम्हाला कागदपत्रे पाठविली असावीत, असे वक्तव्य अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत केले. त्यामुळे पार्थ पवार याला वाचविण्याचे प्रयत्न कायदेशीर पातळीवर सुद्धा उघड्यावर आले.

– अजित पवारांवर टांगती तलवार

कालच नगरपालिका नगरपरिषदांचे निकाल लागले. तिथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सत्तेच्या उबेमुळे यश मिळाले. पण त्यांच्या मागचे भ्रष्टाचाराचे शुक्लकाष्ट दूर होऊ शकले नाही. उलट मुंढवा जमीन घोटाळ्यातले आणखी पुरावे बाहेर आले त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या वर टांगती तलवार आली.

Pawar family gets relief in the Lavasa case;

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात