नाशिक : भाजपच्या सत्तेची वळचण हवी; पण नको भगवी टोपी; पवार काका – पुतण्याची भूमिका नेहमीच दुटप्पी!!, असला प्रकार आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेच्या पार्श्वभूमीवर उघड्यावर आला.Pawar family double standard over hindutv issue
संग्राम जगताप यांनी भगवी टोपी घालून करमाळा आणि अहिल्यानगर मध्ये हिंदुत्ववादी भाषण केल्यानंतर अजित पवारांची गोची झाली. त्यांना सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी सुद्धा घेरले. तोंडी शिव शाहू फुले आंबेडकरांचा घोष आणि दुसरीकडे भाजपची सत्तेची वळचण अशा कोंडीत अजित पवार सापडले. त्यामुळे अजित पवारांनी संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली, तरी देखील संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी भाषणे करायचे थांबविले नाही, पण त्यांनी डोक्यावरची भगवी टोपी तात्पुरती बाजूला काढून ठेवली.
अहिल्या नगरचे स्थानिक राजकारण
अहिल्यानगरच्या मुस्लिमांनी संग्राम जगताप यांना मतदान केले नाही त्यानंतर अहिल्यानगरच्या स्थानिक राजकारणाच्या बेरीज – वजाबाकीच्या दृष्टीने संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली. त्यांच्याभोवती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार झाली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जिहाद विरुद्ध मोठे वातावरण तयार झाले. त्यामध्ये संग्राम जगताप यांच्या भाषणांचा मोठा प्रभाव पडला. पण त्यामुळे अजित पवार अस्वस्थ झाले आपल्या पक्षाची मतपेढी आपल्यापासून दूर जाण्याची भीती त्यांना निर्माण झाली म्हणून त्यांनी संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली.
– जगतापांच्या पाठिंब्याने भाजप + शिवसेनेचे महापौर
पण संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी भाषणे केल्यामुळे चिडलेल्या अजितदादांनी ज्यावेळी अखंड राष्ट्रवादी होती, त्यावेळी संग्राम जगताप यांनी अहिल्यानगर मध्ये पाठिंबा देऊन भाजप आणि शिवसेनेचे महापौर निवडून आणले होते, त्यावेळी मात्र कुठली राजकीय कृती केली नव्हती. अजितदादांनी आणि खुद्द शरद पवारांनी संग्राम जगताप यांना कुठली नोटीस पाठविली नव्हती. वास्तविक त्यावेळी राष्ट्रवादी अखंड होती. अहिल्यानगर मध्ये 2018 मध्ये संग्राम जगताप यांच्या पाठिंब्याने भाजपचे बाळासाहेब वाकळे महापौर झाले. त्यानंतर शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे महापौर झाल्या, त्याच वेळी शरद पवार आणि अजित पवारांनी आणि सुप्रिया सुळे यांनी सुद्धा संग्राम जगताप यांना वेसण घालायला हवी होती. तेव्हा या तिघांनीही तशी कुठलीही राजकीय कृती केली नव्हती. त्यावेळी अहिल्यानगर मधली भाजपची सत्तेची वळचण संग्राम जगताप आणि पवार काका – पुतणे आणि पवारांची मुलगी यांना चालत होती. अहिल्यानगर मधील भाजपची सत्ता राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने आली ही बाब पवार त्रिकूटाला खटकली नव्हती.
त्रिकुटाची भूमिका उघड्यावर
पण आता ज्यावेळी संग्राम जगताप डोक्यावर भगवी टोपी घालून हिंदुत्ववादी भाषणे करायला लागले, त्यावेळी मात्र अजित पवार यांना लगेच शिव शाहू फुले आंबेडकरांचे विचार आठवले सुप्रिया सुळे यांना सुद्धा लगेच महाराष्ट्रातले सामाजिक ऐक्या आठवले म्हणून त्यांनी अजित पवारांना घेरले अजित पवारांनी संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली म्हणून संग्राम जगताप यांनी डोक्यावरची भगवी टोपी काढली आणि आज पुन्हा हिंदुत्ववादीच भाषण केले, पण संग्राम जगताप यांच्या या सगळ्या राजकीय खेळीमुळे पवार त्रिकुटाची दुटप्पी भूमिका महाराष्ट्रासमोर उघड्यावर आली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App