प्रतिनिधी
ठाणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात 2019 च्या सरकार स्थापनेवरून चाललेल्या राजकीय जुगलबंदीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उडी घेऊन शरद पवारांना टोला लगावला आहे. भले शरद पवार हे देवेंद्र फडणवीस यांना क्लीन बोल्ड केले, असे म्हणत असतील पण प्रत्यक्षात पवारांनी अजितदादांना क्लीन बोल्ड केले, असा टोला शिंदेंनी पवारांना लगावला आहे.Pawar clean bowled Ajitdad and not Fadnavis
शिंदे फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झाले त्यावरून अजित पवारांनी सरकारची कामगिरी चांगली नसल्याचा दावा केला. अजितदादांना प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले, अजितदादा विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांनी सरकारला चांगले म्हणणे अपेक्षित आहे का? पण एवढे असूनही अजितदादा हे काही मनापासून बोलत नाहीत.
कारण त्यांना शरद पवारांनी 2019 मध्ये काय केले हे माहिती आहे. शरद पवार हे देवेंद्र फडणवीस यांना आपण क्लीन बोल्ड केले, असे म्हणत असले तरी प्रत्यक्षात त्यांनी अजितदादांनाच क्लीन बोल्ड केले. त्यामुळे अजितदादाच तिथे नाराज आहेत, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल. या संदर्भात शिवसेना आणि भाजपच्या दोन्ही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू आहे. लवकरच चांगली बातमी मिळेल, असेही एकनाथ शिंदे म्हणाले
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App