माळेगाव सहकारी साखर कारखाना ते बेस्ट पतपेढी निवडणूक यामध्ये पवार आणि ठाकरे या दोन्ही ब्रँडचे स्वहस्ते विसर्जन झाले, असे जाहीर करायला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घ्यायला हरकत नाही!! कारण दोन्ही निवडणुकांमध्ये मतदारांनी जो निकाल दिलाय, तो स्पष्ट आहे. पवार आणि ठाकरे ब्रँड यांचा महाराष्ट्रात फक्त माध्यमांनी केलेला बोलबाला आहे. प्रत्यक्षात ते दोन्ही ब्रँड आता इतिहास जमा झाले आहेत किंवा ते इतरांनी वापरून गुळगुळीत केले आहेत.
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचा एवढा बोलबाला झाला की जणू काही बेस्ट पतपेढीची निवडणूक म्हणजे महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक आहे किंवा मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. त्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्याने फार मोठी “क्रांती” घडवून इतर सगळे पक्ष पुरते झोपणार आहेत. पण प्रत्यक्षात तसे काहीही घडले नाही. बेस्ट पतपेढीच्या 15123 मतदारांपैकी 12656 मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या एकीकरणाला एकही जागा मिळवता आली नाही. उलट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची 9 वर्षांची सत्ता एका झटक्यात संपुष्टात आली. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पॅनलला दिलेला राजकीय टेकू खुद्द त्यांच्या किंवा उद्धव ठाकरेंच्या कामी आला नाही. बेस्ट पतपेढीच्या मतदारांनी ठाकरे बंधू यांचे ऐक्य नाकारले. ठाकरे बंधूंचे ऐक्य लिटमस टेस्ट मध्येच फेल झाले.
ही पाहा काँग्रेसची कृतघ्नता; सर्वोच्च नेत्यांना वाचविण्याचे निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तींना हरणाऱ्या निवडणुकीत केलंय उभा!!
– “आयातवीर” नेत्यांच्या मर्यादा
त्याचबरोबर ठाकरे बंधूंच्या ऐक्यात राजकीय खोडा घालण्यासाठी भाजपमध्ये बाहेरून आयात केलेल्या प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्या पॅनेलला देखील मतदारांनी फारच मर्यादित यश दिले. त्याऐवजी शशांक राव यांचे चर्चेत नसलेले पॅनल जिंकवले. याचा अर्थ भाजप मधले “आयातवीर नेते” फक्त मते कापण्याच्या दर्जाचे आहेत. ते भाजपला फार मोठे यश मिळवून देऊ शकत नाहीत, हे सिद्ध झाले.
पण त्या पलीकडे जाऊन बेस्टच्या निवडणुकीने ठाकरे बंधू म्हणजे पवार आजोबा + नातू यांच्यासारखाच अस्तंगत होत चाललेल्या ब्रँड आहे, हे सिद्ध केले.
– पवार ब्रँड अस्तंगत
शरद पवारांनी देखील आपल्या ब्रँडचा वापर करून माळेगाव सहकारी साखर कारखान्यातून अजित पवारांची सत्ता उखडून टाकायचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी अजित पवारांचे पुतणे आणि आपले नातू युगेंद्र पवार यांना भरीस घातले होते. पण पवारांनी त्यावेळी एक “सावधानी” देखील बाळगली होती. ती म्हणजे त्यांनी आपल्या पॅनेलचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे न देता ते युगेंद्र पवार कडे दिले होते. छोट्या निवडणुकीतल्या पराभवाचे खापर आपल्या मुलीच्या डोक्यावर फुटणार नाही, याची “व्यवस्था” यातून पवारांनी केली होती. पण माळेगावचा निकाल जो लागायचा, तोच लागला. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 19651 सभासदांनी शरद पवारांचे नेतृत्व नाकारून अजित पवारांचे नेतृत्व स्वीकारले.
– स्वहस्ते पराभवाचा ठपका
माळेगावच्या छोट्या निवडणुकीत शरद पवारांनी लक्ष घातले नसते, तर पवार ब्रँडला धक्का लागला असे कुणी म्हणू शकले नसते, पण पवारांनी त्या छोट्या निवडणुकीत लक्ष घातले. त्यामुळे शरद पवार ब्रँड अस्तंगत होत चालल्याचे ठळक लक्षण दिसून आले. नेमके तेच ठाकरे बंधूंचे झाले. ठाकरे बंधूंनी ऐक्याचा बोलबाला करताना बेस्टच्या छोट्या निवडणुकीत फारसे लक्ष घातले नसते, तर ठाकरे ब्रँडला फार मोठा धक्का लागला असेही म्हणता आले नसते. पण ठाकरे बंधूंनी बेस्ट पतपेढीची छोटी निवडणूक स्वतःच्या ऐक्याच्या प्रतिष्ठेची केली. त्यामुळे भला मोठा ठाकरे ब्रँड छोट्या निवडणुकीत पराभूत झाला, असे म्हणायची संधी विरोधकांना मिळाली. ठाकरे बंधूंच्या ऐक्याने ठाकरे ब्रँड वर पराभवाचा ठपका स्वहस्ते लावून घेतला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App