राज्यातील मुंबईपासून ते सगळ्या शहरात कोरोना रुग्ण व्हेंटिलेटरअभावी तडफडत आहेत. मात्र, जळगाव जिल्ह्यात पीएम केअर फंडातून केंद्राकडून आलेले 80 टक्के व्हेंटिलेटर धूळखात पडले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.Patients are suffering and in Jalgaon, 80 per cent of the ventilators received from the PM Care Fund have fallen into dust.
विशेष प्रतिनिधी
जळगाव : राज्यातील मुंबईपासून ते सगळ्या शहरात कोरोना रुग्ण व्हेंटिलेटरअभावी तडफडत आहेत. मात्र, जळगाव जिल्ह्यात पीएम केअर फंडातून केंद्राकडून आलेले 80 टक्के व्हेंटिलेटर धूळखात पडले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेश पाटील जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, खासदार रक्षा खडसे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेआहे. यावेळी पाटील म्हणाले, जळगाव जिल्ह्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती आहे.
पण सरकार उपाययोजना करण्यात असमर्थ ठरले आहे. केंद्राकडून पीएम केअर फंडातील 88 व्हेंटिलेर जिल्ह्यात उपलब्ध झाले. मात्र, त्यातील 80 टक्के आजही धूळखात पडून आहेत. आम्ही मागणी केली की काम होत नसेल तर सिव्हील हॉस्पिटलमध्ये सर्जन यांची बदली करावी,
तसेच रेमेडेसिवीर इंजेक्शनसाठी एका कंपनीने अॅडवान्स रक्कम मागितली तरी त्याबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता. आता जिल्हाधिकारी यांनी तयारी दर्शविली आहे. अशाप्रकारे शासनाचा भोंगळ कारभार सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App