विशेष प्रतिनिधी
पुणे : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी हिने पॉवर ऑफ ॲटर्नीचा गैरवापर करुन ४० एकर शासकीय जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया कंपनीस ३०० कोटी रुपयांना विक्री केली.Parth Pawar Land Scam
परंतु तिला याप्रकरणात अटक झाल्यानंतर पोलीसांनी तिच्या पिंपरी व कोरेगावपार्क येथील घरी छापेमारी केली. मात्र, पोलीसांना कागदपत्रेच मिळून आली नाही. त्यामुळे पोलीसांनी तेजवानी हिच्याकडेचौकशी करत तिच्याकडील जमिनीची मूळ कागदपत्र जप्त केली आहे.
शीतल तेजवानी हिने मुळ महार वतनदार यांच्याकडून घेतलेले मुळ पॉवर ऑफ ॲटर्नी, मुळ विकसन करारनामे व इतर वेगवेगळे दस्त लपवून ठेवलेले दस्त जप्त केले आहे. तेजवानीची पोलीस कोठडीची मुदत ११ डिसेंबर पर्यंत असल्याने पोलिसांनी तिच्या कोठडी दरम्यान तिची सखोल चौकशी करणे सुरू केले आहे.
मुद्रांक शुल्क माफी नसताना दस्त नोंदणी
याप्रकरणात बावधन पोलिसांनी मुद्रांक शुल्क विभागाचे दुय्यम निबंधक रवींद्र बाळकृष्ण तारू ( वय ५८) यांना अटक केलेली आहे. तारू याने शितल तेजवानी आणि दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्याशी संगनमत करून दस्ताचे शासकीय मुद्रांक शुल्क न भरता नोंद केली आहे. आमेडिया एंटरप्राईजेस एलपीएल घटकास जिल्हा उद्योग केंद्र, पुणे यांनी इरादा पत्रानुसार कोणतेही प्रकारची मुद्रांक शुल्क माफी दिलेली नसताना, कोणत्या आधारावर मुद्रांक शुल्क माफी देऊन दस्त नोंदणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App