प्रतिनिधी
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली, मात्र त्यातून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव त्यामध्ये नसल्यामुळे स्वतः पंकजा मुंडे नाराज आहेतच, मात्र त्याबरोबर त्यांचे समर्थकही तीव्र नाराज झाले आहेत. हे समर्थक थेट भाजप नेत्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे आता पंकजा मुंडे समर्थकांनी भाजप विरोधात संघर्ष महाराष्ट्रात सुरू केला आहे. Pankaja Munde’s supporters on the streets against BJP leaders
केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या कार्यालयावर दगडफेक
पंकजा मुंडे समर्थकांनी आज रविवारी, १२ जून रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा ताफा दोन ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी पंकजा यांच्या समर्थकांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या कार्यालयावर दगडफेकीचा प्रयत्न केला. यावेळी भाजप कार्यकर्तेदेखील आक्रमक झाले. त्यामुळे मोठा राडा झाला. विशेष म्हणजे अहमदनगरमध्ये पंकजा मुंडे यांच्या एका समर्थकाने दोन दिवसांपूर्वी थेट आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
भाजप नेते भागवत कराड यांच्या कार्यालयाबाहेर पंकजा यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. यावेळी भाजप कार्यकर्तेदेखील समोरासमोर आले. त्यामुळे तणाव वाढला. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने औरंगाबादेत मोठी दुर्घटना टळली. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी आज सकाळी पारगाव तर दुपारी बीड शहरातील बार्शी रोडवरील धांडे नगर परिसरात प्रवीण दरेकर यांच्या गाड्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला.
म्हणून नाराजी
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी बुधवारी, ८ जून रोजी जाहीर केली आहे. भाजप विधान परिषदेत पंकजा मुंडे यांना उमेदवारी देणार अशी जोरदार चर्चा होती. पण भाजपने जाहीर केलेल्या यादीत पंकजा मुंडे यांचे नाव नव्हते. या यादीत विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर, माजी मंत्री राम शिंदे, भाजप महाराष्ट्राचे संघटन सचिव श्रीकांत भारतीय, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे, राज्य भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड अशी नावे आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App