Pankaja Munde : आरक्षणाच्या मुद्द्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या- हा संघर्ष नैसर्गिक, राज्यकर्त्यांनी राजासारखे मन ठेवून सर्वांच्या हिताचा निर्णय घ्यावा

Pankaja Munde

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Pankaja Munde गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यामुळे वातावरण तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर, भाजप नेत्या तथा राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आरक्षणाच्या संघर्षावर महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. आरक्षणावरील संघर्ष हा नैसर्गिक आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी राजासारखे मन ठेवून सर्वांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.Pankaja Munde

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणानंतर राज्य सरकारने मराठा समाजाच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य करत शासन निर्णय (जीआर) जारी केला. मात्र या जीआरवर ओबीसी नेत्यांसह मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, बंजारा समाजानेही आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावर वातावरण तापलेले असतानाच पंकजा मुंडे यांनी उपरोक्त विधान केले आहे.Pankaja Munde



नेमके काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

ओबीसी-मराठा संघर्ष आहे. मात्र ज्या पद्धतीने तो मांडला जातोय, त्या पद्धतीने मला पाहायला मिळत नसल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. मी तसे चष्मे लावून फिरत नाही. मी एखाद्या माणसाकडे बघत असताना जातीचा रंग पाहत नाही. त्यामुळे कदाचित तसे मला दिसत नाही, असेही त्यांनी म्हटले. अनेक समाज वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षण मागत आहेत. तिथला समाज विरोध करतो हे नैसर्गिक आहे. जसे त्यांचे मागणे नैसर्गिक तसा विरोधही नैसर्गिक आहे. यातून मार्ग काढणे हे नेत्याचे कर्तव्य आहे. आत्ताच्या राज्यकर्त्यांनी राजासारखे मन ठेवून सर्वांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे. सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या लोकांना कुठेही धक्का न लागता निर्णय घेतला पाहिजे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

बीडला रेल्वेसाठी मोदी-फडणवीसांचे मानले आभार

बीड जिल्ह्यात रेल्वे दाखल झाल्यानंतर, पंकजा मुंडे यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. त्या म्हणाल्या, ‘साहेब नेहमी म्हणायचे की, बीडची रेल्वे, बीडची रेल्वे… कारण परळीत रेल्वे होती, पण बीडमध्ये नसल्यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटला.’ गोपीनाथ मुंडेंनी खासदार झाल्यावर हा विषय पहिल्यांदा मांडल्याचे त्यांनी सांगितले. या योगदानाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. भविष्यात बीड-परळी रेल्वे मार्गासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानावरही भाष्य

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत बोलताना पंकजा मुंडे यांनी सांगितले की, नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली आहे आणि यावर उद्याच्या कॅबिनेट बैठकीत चर्चा होईल. ‘सरकारची मानसिकता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहण्याची आहे,’ असे आश्वासन त्यांनी दिले.

Pankaja Munde Says Reservation Conflict Is Natural

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात