विशेष प्रतिनिधी
बीड : Pankaja Munde राज्याच्या पर्यावरण मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील भगवान गडाला भेट दिली. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, जोपर्यंत लोकांना मी हवी आहे, तोपर्यंत मी काम करत राहील. ज्यावेळेस लोक म्हणतील की आता आम्हाला तुमची गरज नाही त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेल. तसेच पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे.Pankaja Munde
….त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेल
पंकजा मुंडे म्हणाल्या, जोपर्यंत लोकांना मी हवी आहे, तोपर्यंत मी काम करत राहील. ज्यावेळेस लोक म्हणतील की आता आम्हाला तुमची गरज नाही त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेल. राजकारणात आणि धर्मकारणात एकमेकांशी नाते असलेच पाहिजे. राजकारणात काम करणाऱ्या माणसाने धर्मकारणात हस्तक्षेप करू नये. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांपासून माहीत आहे की दर वेळी राजसत्ता आणि धर्मसत्ता ही हातात हात घालून चालत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उदाहरण बघा, सगळे जग बघत आहे.
मी डोळे जरी झाकले तरी मला भगवान बाबांचे साक्षात दर्शन होते
पंकजा मुंडे म्हणाल्या, भगवान बाबा यांच्याविषयी माझ्या मनात काय आहे हे मी शब्दांत कधीच सांगू शकणार नाही. भगवान बाबांच्या दर्शनासाठी मला कुठेही जावे लागत नाही. मी डोळे जरी झाकले तरी मला भगवान बाबांचे साक्षात दर्शन होते. त्यांच्या पवित्र स्मृती आहेत. आम्ही त्यांना पहिले नाही. पण त्यांच्या कहाण्या आज आपण ऐकतो. स्वतःला सत्व तत्व इतके पाळले, स्वतःचे सत्व सिद्ध कार्यासाठी त्यांनी एवढा त्याग केला. त्यांच्या मनात कधी सुद्धा स्वार्थ नव्हता. तसेच आमच्या मीराआई साहेब आहेत.
पर्यावरण मंत्री समोर फटाके उडवून पर्यावरणाची वाट लावता का?
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, लोक मला विचारतात तुम्ही जिथे जातात तिथे तुमचेच लोक फुले घेऊन स्वागतासाठी तयार असतात का? काहींना असेही वाटत असते. पण मी म्हणते मलाच माहीत नसते माझ्या स्वागतासाठी कोण एवढी तयारी करतं. मी तर नेहमी म्हणत असते की जेसीबीने फुले नका उधळू. आता मी रागावले म्हणून फटाके फोडणे बंद केले. पर्यावरण मंत्री समोर फटाके उडवून पर्यावरणाची वाट लावता का?, असा मिश्किल सवालही त्यांनी केला.
मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड
कोयत्यांना धार देण्यासाठी मी कायम उभी राहील, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या चुकीचा अर्थ घेऊ नका. मी कोणत्या गुंडाला घाबरत नाही. मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे. मी कशामुळे नवीन पक्ष स्थापन करेल. दिल्लीमध्ये नरेंद्रजी मोदी यांची सत्ता आहे. राज्यात देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. मी स्वतः मंत्री आहे असं असताना मी नवीन पक्ष का काढेल? असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मला मंत्री झाले काय नाही झाले काय, काही फरक पडत नाही. एवढे प्रेम तुम्ही करता असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. पण मंत्रिपदामुळे अधिकार येतात असेही त्या म्हणाल्या. 1825 दिवस आहेत माझ्याकडे सत्तेचे. वरचे 225 दिवस असेच जातात. माझ्या 1600 दिवसात राज्यातील प्रत्येक भागात माझ्या विभागाकडून न्याय देण्याचे काम करेल, असे आश्वासन देखील पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना दिले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App