प्रतिनिधी
मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि माध्यमांनी विपर्यास केलेली वक्तव्ये हा गेल्या अडीच वर्षातला मराठी माध्यमांचा खेळ झाला आहे. पंकजा मुंडे यांनी परळीत जलजीवन विकास मिशनच्या कार्यक्रमात एक वक्तव्य केले आणि त्यावरून मराठी माध्यमांनी लगेच पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान पदावर दावा ठोकल्याच्या बातम्या केल्या. Pankaja munde didn’t claim prime ministership, but marathi media did it mischievously!!
पंकजा मुंडेंनी भाषणाच्या ओघात महिला विकास करू शकत नाहीत का? देशाची प्रधानमंत्री जर महिला होऊ शकते, तर तुमची लेक विकास करू शकत नाही का??, अशा आशयाचे विधान केले. मात्र केवळ देशाची प्रधानमंत्री महिला होऊ शकते तर तुमची लेक होऊ शकत नाही का??, अशा एका वक्तव्याच्या सुतावरून मराठी माध्यमांनी लगेच पंकजा मुंडेंच्या पंतप्रधान पदाचा स्वर्ग गाठला.
पंकजा मुंडेंचे मूळ वक्तव्य
पंकजा मुंडे म्हणाल्या, मी शेजारच्या गावात गेले होते, तर तिथल्या लोकांनी मला सांगितले, ताई तुम्ही महिला आहात म्हणून आम्ही तुम्हाला मत दिले नाही. कारण महिला विकास करू शकत नाहीत. त्यावर मी त्यांना विचारले, महिला जर देशाची प्रधानमंत्री होऊ शकते तर तुमची लेक होऊ शकत नाही का?, तुम्ही साथ देणे महत्त्वाचे आहे. मुंडे साहेबांच्या काळात गावाला एवढा निधी दिला, एवढा विकास केला तरी देखील तुम्ही म्हणता महिला विकास करत नाही. तुम्ही एकजूट राखून साथ दिली पाहिजे, असे ते वक्तव्य होते.
मात्र या एकाच वक्तव्यावरून मराठी माध्यमांनी लगेच पंकजा मुंडे यांच्या जुन्या नाराजीचा आणि त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांचा विषय लावून धरला. पंकजा मुंडेंनी 2019 च्या निवडणुकीपूर्वी आपण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहोत, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता त्यांनी थेट पंतप्रधान पदावर दावा सांगितला आहे, अशा बातम्या मराठी माध्यमांनी केल्या आहेत.
पण पंकजा मुंडे यांचे मूळ वक्तव्य तपासून पाहिले, तर त्यात पंतप्रधान पदावर दावा वगैरे काही नाही. उलट महिला विकास करू शकत नाहीत, या ग्रामस्थांच्या तक्रारीवर त्यांनी परखड प्रतिक्रिया व्यक्त करून महिला विकास करू शकतात. एक महिला जर या देशाची पंतप्रधान होऊ शकते, तर महिला विकास का करू शकत नाही??, असा सवाल केल्याच्याच आशयाचे ते वक्तव्य आहे हे दिसून येते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App