विशेष प्रतिनिधी
मुंबई – राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता किमान आठ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलाच असेल, तर आधी महाराष्ट्रातल्या उद्योजक, मजूर आणि नोकरदारांना दिलासा द्या आणि नंतर योग्य तो निर्णय घ्या, अशी सूचना भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांनी केली आहे. pankaja munde demands relief for industry, labours and employes
Lockdown मुळे जरी गरिबांची, व्यापाराची, economy ची परिस्थिती कठीण होईल तरी पर्याय काय आहे??Coronaची साखळी कशी तोडणार??मजुर आणि उद्योजकांना नोकरदारांना विश्वास देणे आवश्यक आहे.आरोग्य यंत्रणा वरील भार हा गांभीर्याने घेण्याची गरज आहे.. — Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 10, 2021
Lockdown मुळे जरी गरिबांची, व्यापाराची, economy ची परिस्थिती कठीण होईल तरी पर्याय काय आहे??Coronaची साखळी कशी तोडणार??मजुर आणि उद्योजकांना नोकरदारांना विश्वास देणे आवश्यक आहे.आरोग्य यंत्रणा वरील भार हा गांभीर्याने घेण्याची गरज आहे..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 10, 2021
कोरोना परिस्थिती बाबत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी लॉकडाऊन बाबत सूचक वक्तव्य केले आहे. सर्वांनी नियमांचे पालन करण्याची आणि सहकार्य करण्यासाठी आवाहनही त्यांनी केले आहे.
पंकजा मुंडे ट्विटमध्ये म्हणतात, की ‘लॉकडाऊनमुळे जरी गरिबांची, व्यापाराची, अर्थव्यवस्थेची परिस्थिती कठीण होईल, तरी पर्याय काय आहे? कोरनीची साखळी कशी तोडणार? मजूर, उद्योजकांना आणि नोकरदारांना विश्वास देणे आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणांवरील भार हा गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
हे ही वाचा
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App