विशेष प्रतिनिधी
पंढरपूर: रस्ता हा विकासाचं द्वार असतो. आज पंढपूरकडे जाणारे रस्ते तयार होत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात भागवत धर्माची पताका आणखी उंचावेल याबाबत माझ्या मनात शंका नाही असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि तुकाराम महाराज पालखी मार्ग यांचं व्हर्चुअली भूमिपूजन करण्यात आलं.PANDHARPUR: Prime Minister Narendra Modi asked for three blessings saying that my Maher is Pandhari; The response given by Pandharpurkar
व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंढरपूरकरांशी संवाद साधला. यावेळी आपल्या भाषणाची सुरूवात ही त्यांनी मराठीतून केली. तसंच पंढरपूरकरांकडे तीन आशीर्वाद मागितले ज्याला उपस्थितांनी हात उंचावून अभिवादन केलं.
काय म्हणाले नरेंद्र मोदी?
*मार्गावर दुतर्फा वृक्षांची लागवड करा
तुम्ही माझ्यावर कायमच स्नेह ठेवता हे मला माहित आहे. त्यामुळे आशीर्वाद म्हणून मला तीन गोष्टी द्या. पहिली गोष्ट म्हणजे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी मार्गावर जे पादचारी मार्ग तयार करण्यात येत आहेत त्या मार्गावर दुतर्फा वृक्षांची लागवड करा. महामार्ग तयार होईलर्यंत ही झाडं मोठी होती आणि सावली देतील.
*पालखी मार्गावर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा
दुसरा आशीर्वाद म्हणजे पालखी मार्गावर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा ज्याचा वारी चालणाऱ्या वारकऱ्यांना फायदा होईल.
*भारतातील सर्वात स्वच्छ तीर्थस्थळ
तिसरा आशीर्वाद मला पंढरपूरसाठी हवा आहे. भारतातील सर्वात स्वच्छ तीर्थस्थळ ही भारताची ओळख झाली पाहिजे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. हे तीन आशीर्वाद आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितले आहेत. ज्यानंतर उपस्थितांनी हात उंचावले. तुम्ही हात उंचावले म्हणजे मला हे आशीर्वाद मिळाले असं मी समजतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
आणखी काय म्हणाले मोदी?
पंढरपूरला जाणाऱ्या वारीमध्ये कोणताही भेदाभेद नसतो, जातपात नसते. वारकरी हा सर्वांचा गुरुबंधू असतो. वारकऱ्यांची जात एकच धर्म एक आहे. त्यांचं लक्ष्यही एकच असतं विठ्ठल. विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणारे मार्ग वेगवेगळे असले तरीही लक्ष्य असतं विठ्ठल. म्हणजे विठ्ठल गोत्रं आहे. मी जेव्हा सबका साथ, सबका विकास म्हणतो त्याच्यामागे हीच भावना असते. हीच महान परंपरा असते. सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या विकासासाठी प्रेरित करते.
पंढरपूरची अभा, अभिव्यक्ती सर्व काही अलौकीक आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.
आपण म्हणतो ना… माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिवरी. माझं पहिलं नातं गुजरातच्या द्वारकाशी आहे. माझं दुसरं नातं काशीशी आहे. मी काशीचा रहिवासी आहे. आणि आपल्यासाठी पंढरपूर ही दुसरी काशी आहे. या भूमीत आजही देवाचा वास आहे.
सृष्टीची निर्मिती झाली नव्हती तेव्हापासून पंढरपूर अस्तित्वात असल्याचं संत नामदेवांनीही सांगितलं आहे. या भूमीने अनेक संत दिले. युग संत निर्माण केले. या भूमीने भारताला नवं चैतन्य दिलं, ऊर्जा दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App