कोरोना काळात निवडणूक आयोगाने पंढरपूर मध्ये कोणतेही निर्बंध न लादता निवडणूक घेतली. तर निर्बंध लावून वारकऱ्यांना वारी करण्यासाठी परवानगी का देण्यात येऊ नये, असा सवाल वारकऱ्यांनी केला आहे. याबाबत न्यायालयात जाण्याचा इशाराही वारकरी संघटनांनी दिला आहे.Pandharpur elections without restrictions, then why not Wari with restrictions? Warakaris question, warning to go to court
विशेष प्रतिनिधी
अकोला : कोरोना काळात निवडणूक आयोगाने पंढरपूर मध्ये कोणतेही निर्बंध न लादता निवडणूक घेतली. तर निर्बंध लावून वारकऱ्यांना वारी करण्यासाठी परवानगी का देण्यात येऊ नये, असा सवाल वारकऱ्यांनी केला आहे. याबाबत न्यायालयात जाण्याचा इशाराही वारकरी संघटनांनी दिला आहे.
मागील वर्षी कोरोना संसगार्मुळे वारीला मुकावे लागलेल्या वारकºयांनी यंदा पायी वारीला परवानगी देण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप सरकारकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही.
या पार्श्वभूमीवर आमच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याची खंत व्यक्त करत विदभार्तून जाणाºया पालखी सोहळ्यासाठी नागपूरच्या न्यायालयात जनहित याचिका दाखल करु, असा इशारा देण्यात आला आहे.
आषाढी वारीसाठी महाराष्ट्रातून मानाच्या 9 पालखी सोहळ्यात किमान पाचशे वारकऱ्यांच्या उपस्थितीत पायी वारी करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे. मानाच्या पालखीचे व्यवस्थापक, काही फडकरी संघटनाा आणि विश्व वारकरी सेनेने ही मागणी केली आहे.
महाराष्ट्रात मानाच्या पालखीच्या व्यतिरिक्त शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या बऱ्यांच पालख्या आहेत. यातील प्रत्येक पालखीसोबत फक्त दहा वारकऱ्यांना वाहनाने जाण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी विश्व वारकरी सेनेने केली आहे.
आषाढी वारीला परवानगी मिळावी या मागणीसाठी 28 मे ला वारकरी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक पुण्यात पार पडली आहे. यावेळी अजित पवार यांनी या सर्वांशी चर्चा करत त्यांच्या मागण्या समजून घेतल्या.
तसेच यावर लवकरच निर्णय घेण्याचं आश्वासन दिले आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात अजित पवार यांनी आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App