वृत्तसंस्था
पंढरपूर : पंढरपूर—मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक निवडणूक नुकतीच पार पडली. पण, त्याचे दुष्परिणाम या दोन्ही तालुक्यातील नागरिकांना आता भोगावे लागत आहेत. निवडणुकीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. Pandharpur: Corona infection has increased in Mangalvedha, adverse effects of assembly elections
सोलापूर जिल्ह्यत सर्वाधिक कोरोना रूग्ण पंढरपूर तालुक्यात आढळले. एकूण ११ हजार ३०० जणांना कोरोना झाला असून २६४ जणांचा जीव गेला.
दरम्यान पंढरपूर—मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत लोकांचा एकमेकाशी संपर्क आला. केवळ सात दिवसात एक हजारहून अधिक रुग्ण पंढरपूर शहर व तालुक्यात आढळले आहेत.
दरम्यान, दोन्ही तालुक्यात रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे.यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यसाठी मंजूर लसी पैकी पन्नास टक्के लसीकरण पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात करावे, अशी मागणी आ. प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App