नाशिक : बॉलीवूडची खानावळ नाही राहिली “उपयोगी”; म्हणून पाकिस्तानने वाढवली “दहशतवाद्यांची” यादी!!, असंच खरं म्हणजे सलमान खानच्या बाबतीत घडलंय. सलमान खानने कथित स्वरूपात बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचे समर्थन केले त्यानंतर पाकिस्तानने लगेच सलमान खानच्या नावाचा “दहशतवाद्यांच्या” यादीत समावेश करून टाकला. Salman Khan
एरवी पाकिस्तानला आणि पाकिस्तानान्यांना बॉलीवूडचे खानावळ फार पसंत असायची कारण भारतात राहून सुखाने चैनबाजी करून ही बॉलीवूडची खानावळ मनोरंजन आणि करमणुकीच्या नावाखाली पाकिस्तानला हवा असणारा इस्लामी अजेंडा आणि लव्ह जिहाद वर्षानुवर्षे चालवत राहायची. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षात नेमक्या वेळी धर्मनिरपेक्षतेचे ढोल पिटून छुप्या पद्धतीने पाकिस्तानची कड घ्यायची.
– खानावळीचे कारनामे expose
पण गेल्या काही वर्षांपासून भारतात प्रखर राष्ट्रवादाचा विचार मूळ धरू लागल्यानंतर बॉलीवूड मधल्या खानावळीचे जिहादी कारनामे उघड्यावर आले. भारतीय जनमानसावरची खानावळीची पकड ढिल्ली झाली. बॉलीवूडच्या खानावळीचे सिनेमे दणकून आपटले. त्या उलट राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे सिनेमे बॉलीवूडच्या खानावळीपेक्षा सुपरहिट ठरले. कारण भारतामध्ये जागृती वाढली. बॉलीवूडची खानावळ कशा पद्धतीने जिहादी अजेंडा पसरवते याविषयी सोशल मीडियावर प्रचंड मंथन झाले. बॉलीवूडची खानावळ त्यामध्ये expose झाली.
– खानावळीने बदलला ट्रॅक
आपला सर्व प्रकारचा प्रभाव ओसरतोय हे लक्षात घेतल्याबरोबर बॉलीवूडच्या खानावळीने आपला ट्रॅक बदलला आपणही राष्ट्रवादी असल्याचे ढोल पिटायला सुरुवात केली. त्यातूनच सलमान खानने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा पुकारा केला. पण त्याबरोबरच पाकिस्तानी आका चिडले. सलमान खान त्यांचा नावडता झाला. पाकिस्तानी राज्यकर्त्यांना सलमान खानचा फारसा “उपयोग” राहिला नाही. म्हणून त्यांनी सलमान खानच्या नावाचा “दहशतवाद्यांच्या” यादीत समावेश करून टाकला.
– सलमानचा पाठिंबा वाढणार नाही
पण त्यामुळे भारतीय राष्ट्रवादी सरकारला किंवा जागृत झालेल्या राष्ट्रवादी जनतेला फारसा फरक पडला नाही. कारण बलुचिस्तानचे स्वातंत्र्य ही आता काळ्या दगडावरची रेघ झाली असून सलमान खानने त्या स्वातंत्र्याला पाठिंबा दिला किंवा न दिला तरी त्यामुळे काही फरक पडणार नाही. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा देऊन सलमान खानने फार तर भारतातली आणि पाकिस्तानची राष्ट्रवादी चळवळ ओळखली असे म्हणण्याएवढीच त्यातून खूण पटेल. त्या पलीकडे फारसे काही होण्याची शक्यता नाही. भारतात पुन्हा खानावळीला चांगले दिवस येण्याची शक्यता नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App