विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपला पंचाईत ही आहे की त्यांचे आमदार त्यांच्यासोबत राहतील याची काहीच त्यांना शाश्वती नाही. त्यामुळे त्यांची पंचाईत झाल्याने भीती दाखवणे सुरु आहे. आमचे २५ आमदार बाहेर पडणार आहेत मग आम्ही काय वेडे आहोत का? पुन्हा एक माणूस आम्ही परत निवडून येऊ देणार नाही. Our MLAs cannot be divided, Jayant Patil’s claim
एवढे सोप्पे नाही राजीनामा द्यायचा आणि बाहेर पडायचे. जो महाविकास आघाडीतून बाहेर पडेल त्याला लोक सळो की पळो करून टाकतील. ते लोकांना काय सांगणार ? त्यामुळे अशी कुठलीही घटना घडणार नाही. उलट भाजप आमदार आमच्या सरकारवर खूष आहेत असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यावेळी भाजपच्या आमदारांना मोठा निधी दिला. फडणवीस यांनी जितका निधी दिला त्याच्यापेक्षा जास्त निधी आम्ही दिला आहे. तसे फोन करुन भाजप आमदार आम्हाला सांगत आहेत. त्यामुळे आमचे आमदार फुटणे शक्य नाही. जर फुटला तर तो परत विधानसभेत दिसणार नाही असा स्पष्ट इशारा दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App