‘’…अन्यथा साडेतीन जिल्ह्यातल्या पक्षाचा राज्यस्तरीय दर्जा सुद्धा लवकरच धोक्यात येईल!’’

Ram satpute

भाजपा आमदार राम सातपुतेंचा शरद पवारांवर निशाणा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे  अध्यक्ष शरद पवार यांनी देशात मुस्लीम आणि ख्रिश्चन या दोन धर्मांबाबत  चिंताजनक परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. यावरून भाजपा आमदार राम सातपुते यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.  otherwise the state level status of the party in three and a half districts will soon be in trouble Ram Satpute to Sharad Pawar

राम सातपुते म्हणतात, ‘’आदरणीय साहेब अशी काळजी हिंदू बद्दल पण कधी वाटणार ? आपल्या एका हिंदू मुलीवर जी तुमचेच जवळचे सहकारी व राज्याचे माजी गृहमंत्री असलेल्या वळसे पाटील यांच्या मतदारसंघातील मंचर गावची आहे. तिला एकदा भेटून या, तिच्यावर झालेला अन्याय बघा, तुमच्याही डोळ्यात अश्रू येतील, हा विश्वास देतो !’’

याशिवाय ‘’औरंग्याचं उदात्तीकरण करणाऱ्यांविरोधात फक्त अहमदनगर, पुणे नाही तर साऱ्या महाराष्ट्रभरातून रोष आहे, त्यामुळे तमाम शिव-शंभू भक्त हे आंदोलन करणारच! कृपया साहेब, तमाम शिव-शंभू भक्तांचा संयम पाहू नका, अन्यथा साडेतीन जिल्ह्यातल्या पक्षाचा राज्यस्तरीय दर्जा सुद्धा लवकरच धोक्यात येईल!’’ असं राम सातुपते म्हणाले आहेत.

शरद पवार काय म्हणाले होते?

“देशात सध्या मुस्लिम आणि ख्रिश्चन या दोन धर्मांबाबत चिंता वाटावी, अशी परिस्थिती आहे. व्यक्तिगत कारणातून समाज आणि चर्चवर हल्ला करणे चूक आहे. मुस्लिम समाजात चार-दोन चुका होऊ शकतात, तशा गोष्टी हिंदूंकडूनही होऊ शकतात.’’, असं शरद पवार म्हणाले आहेत.

otherwise the state level status of the party in three and a half districts will soon be in trouble Ram Satpute to Sharad Pawar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात