विशेष प्रतिनिधी
मुंबई : बंगाल वाघाची जोडी शक्ती (नर) व करिष्मा (मादी) यांनी जन्म दिलेल्या मादी बछड्याचे नामकरण करण्यात आले असून तिचे नाव ‘वीरा’ असे ठेवण्यात आले. तर हम्बोल्ट पेंग्विन कक्षातील मोल्ट (नर) व फ्लिपर (मादी )यांच्या जोडीच्या दिले नर पिल्लाचे नामकरण ‘आॅस्कर ‘ असे ठेवण्यात आले.Oscar name to humboldt Penguin’s puppy Function at Veermata Jijabai Bhosle zoo
या नामकरणाची घोषणा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील थ्रीडी ऑडिटोरियम येथे केली. पेडणेकर यांच्या हस्ते केक कापून नामकरण झाल्याचे जाहीर करण्यात आले.
याप्रसंगी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ.संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, डॉ. कोमल राऊळ उपस्थित होत्या.पेडणेकर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना म्हणाल्या की, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय, भायखळा येथील हम्बोल्ट पेग्विन कक्षातील डोनाल्ड (नर )व डेझी (मादी ) यांनी गेल्या १ मे रोजी जन्म दिलेल्या नर पिल्लाचे नाव ‘ओरिओ’ असे ठेवण्यात आले.
सुमारे १५ वर्षानौतर औरंगाबाद येथील सिद्धार्थ गार्डन प्राणीसंग्रहालयातून बंगाल वाघाची जोडी शक्ती (नर ) व करिष्मा ( मादी) मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयामध्ये आणण्यात आली.
हवाघासाठी नवीन तयार करण्यात आलेल्या प्रदर्शनीमध्ये नैसर्गिक अधिवास निर्मिती धबधबा, पारदर्शक काचेची प्रदर्शनी, अनुकूल लँण्डस्केप इत्यादी तयार करण्यात आले असून अनुकूल वातावरणात बंगाल वाघाच्या जोडीने एका मादी बछड्याला जन्म दिला आहे.
वाघीण करिष्मा व बछडा वीरा सुखरूप असून बछडा आता दोन महिन्याचा आहे. वाघीण करिष्मा तिच्या बछडयाची व्यवस्थित काळजी घेत असून बछड्याची उत्तम वाढ होत आहे. ‘वीरा’ सहा महिन्यांची होईपर्यंत तिला पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असून तिला जंताची औषधे व लसीकरण करण्यात येत आहे.
पशुवैद्यकांच्या उपस्थितीत फक्त प्राणीपालास बछड्याजवळ जाण्याची परवानगी देण्यात आली असून तिला कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही, याची काळजी घेण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App