विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील गेल्या साधारण महिना – पंधरा दिवसातली अवस्था बघितली तर शीर्षकात म्हटल्याप्रमाणे विरोधकांचे बाऊन्सर्स आणि गुगली वगैरे सुरू आहेत. पण त्यावर सरकार अद्याप ना बीट होतंय, ना सरकार मधल्या कुणाची विकेट जात आहे. Opposition trying to overpower shinde Fadanavis government, but government do not relent
फडणवीसांनी काढलेल्या विकेट
या आधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पहिल्या 6 महिन्यानंतर भाजपने जेव्हा मनापासून विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली, तेव्हा खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर आक्रमक गोलंदाजी केली आणि त्यानंतर पहिल्या काही महिन्यांमध्येच महाविकास आघाडीच्या अनेक विकेट काढल्या. यात अनिल देशमुख आणि नबाब मलिक यांच्यासारखे मंत्री तर होतेच, पण परमवीर सिंग, सचिन वाझे, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सुरक्षेच्या आणि गुंतवणुकी सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकट्या फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या अनेक विकेट काढून दाखवल्या होत्या.
त्या वेळचे सत्ताधारी अखंड शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही फलंदाजांना एकट्या फडणवीसांची गोलंदाजी खेळणे अवघड झाले होते. त्यात त्यांनी पेन ड्राईव्ह सारखे प्रकरण काढून तर महाविकास आघाडी सरकारला वारंवार बीट केले आणि राज्यसभा निवडणूक, पाठोपाठ विधान परिषद निवडणूक या मध्ये तर अख्ख्या सरकारची विकेट काढून दाखवली.
महाविकास आघाडीची गोलंदाजी कमकुवत
पण त्या तुलनेत महाविकास आघाडीची सध्याच्या शिंदे – फडणवीस सरकार विरुद्धची गोलंदाजी फारच कमकुवत वाटत आहे. जे मुद्दे फडणवीसांनी काढून महाविकास आघाडीचे सरकार जेरीस आणून दाखवले, त्यांच्या महत्त्वाच्या मंत्र्यांचे राजीनामे घेऊन दाखवले आणि अखेरीस राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण सरकार घालून दाखवले तशी कामगिरी महाविकास आघाडीतल्या तिन्ही घटक पक्षाच्या राजकीय गोलंदाजांना करताच आलेली नाही. निदान अद्याप तरी करता आलेली नाही.
चेंडू तर बाऊन्सर्स पण सरकार बीट नाही
पण सध्या महाविकास आघाडीतले तिन्ही घटक पक्ष किमान खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाच्या भूमिकेत आल्याचे तरी दिसून येत आहे. महापुरुषांच्या अपमानाच्या निमित्ताने झालेला पुणे बंद आणि 17 डिसेंबरला होणारा मुंबईतला मोर्चा यानिमित्ताने महाविकास आघाडीचे राजकीय गोलंदाज शिंदे – फडणवीस सरकारवर बाउन्सर्स आणि गुगली टाकत आहेत. पण हे मुद्दे आधीच्या विरोधकांचे मुद्द्यांइतके प्रभावी ठरत नाहीत. हे सरकार त्यावर अद्याप तरी बीट झालेले नाही, मग विकेट तर दूरच. अगदी सीमा प्रश्नासारखा मुद्दा काढून देखील सरकार खऱ्या परिणामकारकपणे बीट झालेले दिसले नाही.
नागपूर अधिवेशनात बाउन्सर्स पण कोणाचे?
आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक नेमकी कशी आणि कोणती गोलंदाजी करतात आणि त्यावर शिंदे – फडणवीस सरकार कशी फलंदाजी करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवाय येथे एक महत्त्वाचा मुद्दा येतो आहे तो म्हणजे विरोधक आक्रमक गोलंदाजी करणार हे निश्चित. पण शिंदे – फडणवीस सरकार त्यावर फक्त आक्रमक फलंदाजी करणार की आधीच गोलंदाजीचे राखीव बाउन्सर्स काढून ते निवडक विरोधकांवर वापरणार, या वरही विरोधकांच्या गोलंदाजीची धार खरी की खोटी हे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App