CM Fadnavis : अर्थसंकल्पापूर्वी चहापानावर विरोधकांचा बहिष्कार; सीएम फडणवीस म्हणाले- विरोधकांना चर्चेसाठी संधी होती, त्यांची भूमिका अयोग्य!

CM Fadnavis

प्रतिनिधी

मुंबई : CM Fadnavis सरकारचे 4 आठवड्यांचे अधिवेशन असणार आहे लवकार आटोपणार नाही. आमची प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची तयारी आहे. मात्र विरोधकांनी भले मोठे पत्र पाठवून चहापानाच्या कार्यक्रमाला त्यांनी बहिष्कार टाकला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.CM Fadnavis

संवाद स्थापित करण्याची संधी होती – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज रणजी ट्रॉफी आपल्या राज्यात आणली यासाठी मी विदर्भ टीमचे अभिनंदन करतो. नवीन सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. जसे अजित पवार म्हणाले की अधिवेशन आटोपले जाणार नाही. विरोधी पक्षाने 9 पानाचे पत्र दिले आहे, यातील काही नेत्यांनी सह्या केलेल्या नाहीत. आणि आपण बघितले असेल की हम साथ साथ है अशी परिस्थिती तिथे दिसत नाही. अनेक नेते त्यांच्यात सोबत नसल्याचे दिसते. चहापान या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला, खरेतर त्यांना ही संधी होती. संवाद स्थापित करण्याची संधी होती. या संवादावर त्यांनी बहिष्कार टाकला.



दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, 8 मार्चला अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच महिला दिनाचे औचित्य साधून चर्चा केली जाणार आहे. एकनाथ शिंदे यांनी सांगितले की रोज काहीतरी स्थगिती दिल्याचे कानावर येते आणि मी तर अशी स्थगिती दिलेलीच नसते. कोणी आरोप केला तर तपास करावा अशा सूचना आम्ही देतो. कुठल्याही वेळेस कारवाई तसेच स्थगिती द्यायची असेल तर दुसरी बाजू तपासल्याशिवय आपण निर्णय देत नसतो. तसेच शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर सरकार कारवाई करणार, असे अश्वासन देखिल फडणवीसांनी दिले आहे.

आमदारांची संख्या कमी पण पत्र भलेमोठे पाठवले

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. आमदारांची संख्या कमी पण पत्र भलेमोठे पाठवले. विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही एवढे काम जनतेने केले आहे. अजित पवार अर्थसंकल्प पुन्हा मांडतील. लोकांनी आमच्या कामाची पोचपावती दिली आहे. विकास प्रकल्पांना आम्ही चालना दिली. मुंबईतील अनेक प्रकल्प आपण पाहिले असे अनेक प्रकल्प आपण पुढे नेले आहेत. जलयुक्त शिवार यिजनासारखे अनेक प्रकल्प महविकास आघाडीने बंद केले होते. मी मुख्यमंत्री झाल्यावर ते पुन्हा सुरू केले होते. कल्याणकारी योजना आपण आणल्या आहेत. लाडकी बहिण योजना आहे. हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. या राज्याला पुढे नेण्याचा आमचा अजेंडा आहे. या अर्थसंकल्पात त्याचे प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळेल व या अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी निर्णय घेतले जातील.

आमच्यात कोल्ड वॉर अजिबात नाही – एकनाथ शिंदे

आतापर्यंत अडीच वर्षात असा एकही दिवस गेला नाही की विरोधकांनी आमच्यावर टीका केली नाही. जेव्हा ते जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगली आणि हरतात तेव्हा ईव्हीएम खराब. त्यांनी चर्चा केली पाहिजे. चहापान म्हणजे एक परंपरा आहे. त्यांनी येऊन आमच्याशी चर्चा करावी. विकासाबद्दल बोलावे, त्यात त्यांनी सहभागी व्हावे आम्ही त्यांचे स्वागत करू. सत्ताधारी आणि विरोधक हे दोन चाके आहेत. मी एवढेच सांगेल ज्या बातम्या मुद्दाम पेरल्या जातात यात ज्याचा संबंध नसतो त्याचेही नाव जोडले जाते. विरोधक खोट्या बातम्या पेरत असतात. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. तुम्ही विश्वासार्हता जपली पाहिजे. आमच्यात कोल्ड वार अजिबात नाही. आमचा अजेंडा सत्तेसाठी नाही, जनतेसाठी आहे. त्यामुळे थोडी शहानिशा करून बातम्या दिल्या गेल्या पाहिजे. शेवटी एखादी बातमी दिल्यानंतर परत खरी बातमी द्यावी लागते. जे आरोप केले आहेत ते खरे आहेत की नाहीत ते तपासले पाहिजे. आम्ही सूड भावनेने काम करणार नाही. कुठल्याही आकस बुद्धीने आम्ही कारवाई करणार नाही. अर्थसंकल्प हे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आहे. विरोधक सोबत आले तर त्यांचेही नाव होईल, त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या समस्या सुटतील, असेही शिंदे म्हणाले.

Opposition boycotts tea party before budget; CM Fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात