विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, के. चंद्रशेखर राव हे तीन बडे नेते काँग्रेसला वगळून विरोधकांची एकजूट साधू पाहत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन विरोधात विरोधकांची एकजूट करण्याचा आज प्रयत्न चालविला आहे. त्यांनी नवी दिल्लीतील आपल्या 6 जनपथ या निवासस्थानी एक बैठक बोलावली असून त्यामध्ये सर्व विरोधकांनी यावे, असे आवाहन करणारे पत्र पाठवले आहे. यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनशी संबंधित काही प्रश्न पवारांनी उपस्थित केले आहेत. Opponents united against EVM at Pawar’s house today
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन कसे हॅक होऊ शकते आणि त्या हॅक झालेल्या मशीनमधून येणारे जनमताचे कौल आपण मान्य करायचे का??, असा सवाल यांनी या पत्रात सर्व विरोधकांना केला आहे. पवारांच्या घरी आज सायंकाळी 6.00 वाजता होणाऱ्या बैठकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन हॅक कसे केले जाऊ शकते, त्याचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन संदर्भात निवडणूक आयोगाने सातत्याने काही स्पष्टीकरणे दिली आहेत. पण तरी देखील विरोधकांच्या फिटलेल्या नाहीत.
ईव्हीएम च्या कार्यपद्धतीबद्दल अनेक शंकांना उत्तर देण्याची हमी आयोग देत असतं. इलेक्ट्रॉनिक चिप असलेली कुठलीही मशीन हॅक केली जाऊ शकते.. असं म्हणत या मुद्द्यावर विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचं आवाहन शरद पवारांनी केलं आहे. उद्याची बैठक त्यासाठी 👇👇 pic.twitter.com/PxlSqPLGOH — Prashant Kadam (@_prashantkadam) March 22, 2023
ईव्हीएम च्या कार्यपद्धतीबद्दल अनेक शंकांना उत्तर देण्याची हमी आयोग देत असतं.
इलेक्ट्रॉनिक चिप असलेली कुठलीही मशीन हॅक केली जाऊ शकते.. असं म्हणत या मुद्द्यावर विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचं आवाहन शरद पवारांनी केलं आहे. उद्याची बैठक त्यासाठी 👇👇 pic.twitter.com/PxlSqPLGOH
— Prashant Kadam (@_prashantkadam) March 22, 2023
शरद पवारांनी विरोधकांची एकजूट करण्याचा चालवलेला हा प्रयत्न काही पाहिलाच नाही. याआधी पवारांच्या घरी अशीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु त्या बैठकीला फारच थंड प्रतिसाद मिळाल्याच्या बातम्या त्यावेळी आल्या होत्या. यशवंत सिन्हा यांनी संबंधित बैठक पवारांच्या घरी बोलावली होती. पण त्यानंतर ही बैठक केवळ आपल्या घरी झाली यापेक्षा आपला त्यामध्ये कोणताही सहभाग नव्हता, असा दावा त्यावेळी शरद पवारांनी बैठकीला मिळालेला थंडा प्रतिसाद पाहून केला होता. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आज सायंकाळी बोलविलेल्या बैठकीला विरोधी पक्षांची किती हजर राहतात आणि त्याला पण कसा प्रतिसाद देतात??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App