फक्त औरंगाबाद शहराचे नाव बदलले की जिल्ह्याचे? विरोधी पक्षनेते दानवेंचा सवाल, फडणवीसांनी समजावून सांगितली प्रक्रिया

प्रतिनिधी

मुंबई : केंद्र सरकारने नुकतीच उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्यासाठी मंजुरी दिली आहे. परंतु, या नामांतरावरून नवा संभ्रम निर्माण झाल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे म्हणणे आहे. धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर ही नावे फक्त शहराची बदलली गेली आहेत, की संपूर्ण जिल्ह्याचेच नामकरण होणार आहे. याबाबत शंका असल्याचे दानवे म्हणाले.Only the name of Aurangabad city or the district was changed? Asked by opposition leader Danve, Fadnavis explained the process

अंबादास दानवे यांनी यासंबधी ट्विट करत “हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे.” तर अंबादास दानवे यांच्या या प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत, त्यांना संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली आहे.



अंबादास दानवे यांचा प्रश्न

“हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. औरंगजेबाचे नाव मिटवायचे असेल तर जिल्हा पण संभाजीनगर असावा. ता. ‘छत्रपती संभाजीनगर जिल्हा औरंगाबाद’, असे यापुढे लिहावे लागेल का? हे पण सांगावे.” असं ट्वीट विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे. दानवे यांनी हे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टॅग केलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उत्तर

“अंबादासजी, आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते. तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण झाले आहे. त्यानंतर महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभाग अधिसूचना जारी करेल. तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो. अर्धवट काहीच ठेवत नाही” असं ट्वीट करत फडणवीसांनी नामांतराची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली.

Only the name of Aurangabad city or the district was changed? Asked by opposition leader Danve, Fadnavis explained the process

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात