सत्यातले अर्धेच सांगितले उरलेले नंतर सांगीनच; फडणवीसांचे पवारांना पुन्हा आव्हान!!

प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीने ज्या प्रकारे सुडाचे राजकारण केले. राजकीय नेते, पत्रकार किंवा विविध क्षेत्रातली लोकं असतील सरकारविरुद्ध बोललात तर तुम्हाला सोडणार नाही, अशी त्यांची कार्यपद्धती होती असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ‘झी 24 तास’च्या ‘Black and White’ या विशेष कार्यक्रमात मुख्य संपादक निलेश खरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला. त्याचवेळी आणि ७२ तासांचे सरकार या संदर्भात आपण अर्धसत्य नव्हे, तर सत्यातले अर्धेच सांगितले आहे. उरलेले अर्धे योग्य वेळेला सांगेनच पण तुम्ही शरद पवारांना देखील या संदर्भात विचारले पाहिजे, अशा शब्दात फडणवीस यांनी भेट शरद पवारांना पुन्हा एकदा आव्हान दिले. Only half of the truth has been told, the rest will be told later; Fadnavis challenges Pawar again

– ठाकरे – पवार सरकारच्या मीच टार्गेटवर

आम्ही राजकीय शत्रू नाही तर वैचारिक विरोधक आहोत. पण ठाकरे – पवार काळात मलाही टार्गेट करण्यात आलं, मला जेलमध्ये टाकण्यासाठी सुपारी देण्यात आली होती. षडयंत्र करुन मला आणि माझ्या कुटुंबियांना राजकीय जीवनात कसं संपवता येईल असे प्रयत्नही झाले आहेत, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. माझ्याकडे याचे पुरावे आहेत आणि योग्यवेळी मी ते बाहेर काढेन असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.

कारण मिळालं असतं तर तुरुंगात टाकलं असतं

माझ्याविरोधात कारण मिळालं असतं तर मला तुरुंगात टाकलंच असतं, सुपारी दिली होती, पण ज्यांना सुपारी दिली होती, त्यांना माझ्याविरुध्द सबळ पुरावे सापडले नाहीत. दोन वेळा प्रयत्न झाला, पण दोन्ही वेळा प्रयत्न अयशस्वी झाला. काही अधिकाऱ्यांना हाताशी धरलं, पण अधिकाऱ्यांनी नकार दिला, काही पुरावेच हाती नाहीत, तर कारवाई कशी करणार असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

अतिशय खालच्या दर्जाला जाऊन मला आणि कुटुंबियांना अडचणीत आणता येईल, यासंदर्भातही बरंच कुभांड रचण्यात आले होते, पण योग्यवेळी लक्षात आल्याने आपण ते थांबवू शकलो असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसंच दररोज सकाळी 9.00 टीव्हीवर येऊन बोललणाऱ्यांवर त्यांच्या पक्षाने कंट्रोल ठेवला तर राजकीय वातावरण सुधारेल असा सल्लाही त्यांनी दिला.

Only half of the truth has been told, the rest will be told later; Fadnavis challenges Pawar again

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात