फॅक्टरीतून कमी दराने स्टील पुरवू शकताे अशी जाहीरात ऑनलाईन करुन स्टील विक्रीच्या बहाण्याने आर्थिक फसवणुक करणाऱ्या टाेळीस पुणे सायबर पाेलीसांच्या पथकाने जेरबंद केले आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे-फॅक्टरीतून कमी दराने स्टील पुरवू शकताे अशी जाहीरात ऑनलाईन करुन स्टील विक्रीच्या बहाण्याने आर्थिक फसवणुक करणाऱ्या टाेळीस पुणे सायबर पाेलीसांच्या पथकाने जेरबंद केले आहे. याप्रकरणी इरफान ऊर्फ इशान अब्दुल रहेमान शेख (वय-३८,रा.गाेरेगाव,मुंबई), हितेश नंदकुमार मिस्त्री (४५,रा.भाईंदर, ठाणे) व राेनक किरीट मेहता (३७,रा.बाळकेश्र्वर, मुंबई) अशी सदर गुन्हा दाखल झालेल्या तीन आराेपींची नावे आहे. online steel material provide in cheap rate advertisements of one gang and cheated the people..racket burst by Pune cyber police team
पुणे सायबर पाेलीस ठाण्यात तक्रारदार दिलेल्या तक्रारदार यांना मंडप स्ट्रक्चर साहित्यासाठी स्टीलची गरज हाेती त्याकरिता स्टील खरेदीसाठी त्यांनी इंडिया मार्ट या मार्केटिंग अॅपवर चाैकशी करण्याकरिता एन्क्वायरी पाेस्ट टाकली हाेती. त्यानुसार त्यांना वेगवेगळे फाेन येवून किती माल पाहिजे अशी चाैकशी हाेऊ लागली. दरम्यान, राजेश शहा नावाने स्टील व्यवसायातील ब्राेकर बाेलत असल्याचे सांगुन कमी दराने स्टील पुरवू शकताे असे सांगून सदर व्यक्तीने वाॅटसअपवर काेटेशन पाठवून व्यवहार पक्का केला. त्यानुसार तक्रारदार यांचेकडून १२ लाख चार हजार रुपये स्विकारण्यात आले.
परंतु पैसे देवूनही स्टील मिळेना म्हणून त्यांनी आराेपींच्या बँक व फाेन नंबरचे डिटेल्स नुसार चाैकशी केली असता ते खाेटे स्टील विक्रेते असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी याबाबत सायबर पाेलीसांकडे तक्रार दिली.
पाेलीसांनी आराेपींबाबत मिळालेल्या माहितीचा तांत्रिक अभ्यास व विश्लेषण करुन आराेपी मुंबईत असल्याचे निष्पन्न केले. एक महिन्यापूर्वी आराेपीच्या पत्त्यावर पाेलीस पाेहचून तपास केला असता, झाेपडप्ट्टी परिसरातील गर्दीच्या ठिकाणी पाेलीसांचा सुगावा लागल्याने आराेपी पसार झाला हाेता. त्यानंतर पाेलीसांनी आराेपींचे आणखी तांत्रिक विश्लेषण केले असता, ताे पुन्हा मुंबई परिसरात आल्याचे निे्पन्न झाल्याने ते पकडण्यास गेले असता, आराेपी माेटारसायकलवर पळून जाण्याचा प्रयत्न करु लागल्याने पाेलीसांनी बळाचा वापर करुन त्यास ताब्यात घेतले. त्याच्या घरझडतीत आदिनाथ मेटल प्रमाणे इतर बऱ्याच फर्मची खाेटी नाेंदणी कागदपत्रे, वेगवेगळया कंपन्यांची व्हीजीटिंग कार्डस, वेगवेगळी सिमकार्डस, एटीएम कार्डस, बँक खाती क्रामंक/कागदपत्रे, इतर फर्मच्या नावाचे स्टॅम्प मिळून आले आहे. त्याचा साथीदार हितेश मिस्त्री याचे पत्नीच्या बँक खात्यावर अाराेपी इरफान याने पैसे पाठविल्याचे ही तपासात समाेर आले आहे. तर, राेनक मेहता याचेकडे जावून पाेलीसांनी तपास केला असता, ताे आजारी असल्याने त्यास चाैकशीसाठी हजर राहण्याची नाेटीस बजाविण्यात आली आहे. सदर आराेपींनी मागील अनेक वर्षापासून लाेकांची ऑनलाईन फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस अाला आहे.
सदर गुन्हयाचा तपास पाेलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,सहपाेलीस आयुक्त रविंद्र शिसवे, अपर पाेलीस आयुक्त रामनाथ पाेकळे, पाेलीस उपआयुक्त भाग्यश्री नवटके, एसीपी विजय पळसुले, वरिष्ठ पाेलीस निरीक्षक डी.एस.हाके, पाेउनि ए.डफळ, पाेअं संदेश कर्णे, नितीन चांदणे, अनिल पुंडलिक यांचे पथकाने केले अाहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App