विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोराना रोखण्यासाठी केवळ निर्बंध लावणे एवढेच काम करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने नागरिकांच्या संतापानंतर एक पाऊल मागे घेतले. जिम आणि ब्युटी पार्लरवरील बंदी मागे घेण्यात आली आहे.One step back from the state government after the outrage of the citizens, the restrictions on gyms and beauty parlors were lifted
राज्य सरकारच्या सुधारीत नवीन नियमावलीनुसार जिम आणि ब्युटीपार्लरवरील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. 50 टक्के क्षमतेने जीम आणि ब्युटी पार्लर सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे नवे आदेश रविवारी जारी करण्यात आले आहेत.
10 जानेवारीपासून हे आदेश लागू होणार आहेत. यामध्ये नवीन नियमांचे पालन करणे गरजेचे असणार आहे. यामध्ये जीम आणि ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्यांसह ग्राहकांनी लस घेणे गरजेचे आहे. या दोघांनी लसीचे दोन डोस घेतले असतील तरच त्यांना परवानगी मिळणार असल्याचे नवीन आदेशात सांगण्यात आले आहे.
स्वीमिंग पूल, जिम, स्पा, वेलनेस सेंटर्स आणि ब्यूटी सलून्स बंद राहतील, असे आधीच्या आदेशात म्हटले होते. मात्र, या निर्णयाला मोठा विरोध करण्यात आला होता. जाहीर केलेल्या नवीन नियमावलीमध्ये थोडा बदल करून ब्युटी पार्लर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी,
अशी मागणी महाराष्ट्र सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनकडून करण्यात आली होती. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीमध्ये सलून व्यावसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती.
मात्र जीम आणि ब्युटी पार्लरला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे विरोध होत होता. तसेच आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. मात्र अखेर काही नियम घालून परवानगी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App