वृत्तसंस्था
मुंबई : राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला पण पंतप्रधान इंदिरा गांधींनी तर सावरकरांचीच धोरणे अंमलात आणली. त्यांनी पाकिस्तान तोडून दाखवला, अशा शब्दांमध्ये सावरकरांचे पणतू आणि सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी राहुल गांधींचे पुन्हा एकदा वाभाडे काढले.
सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींची कानउघाडणी केली. इंदिरा गांधींनी सावरकरांना देशाचे वीर सुपुत्र म्हटले होते याची आठवण करून दिली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांविषयी अपमानास्पद उद्गार काढू नयेत अन्यथा कारवाई करू, अशी तंबी दिली. या मुद्द्यावरून रणजीत सावरकर यांनी देखील राहुल गांधींची खेचली. सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर तरी राहुल गांधी सुधारतील आणि ते सुधारले नाहीत, तर आम्ही खटले पुढे चालवून त्यांना जेलमध्ये घालू, असा इशारा रणजीत सावरकर यांनी दिला.
रणजीत सावरकर म्हणाले :
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App