नागपूरच्या दंगलीत “सर तन से जुदा” नारे पोस्ट करत आगीत तेल; भडकाऊ सोशल मीडिया पोस्ट्सवर ४ FIR; तर ६ जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल!!

Nagpur violence

विशेष प्रतिनिधी

नागपूर : नागपूर मध्ये औरंगजेब समर्थकांनी केलेल्या दंगलीत सर तन से जुदा, अल्ला हो अकबर वगैरे नारे पोस्ट करत आगीत तेल ओतण्याचे काम शेकडो सोशल मीडिया कर्मींनी केले. त्यांच्याविरुद्ध नागपूर पोलिसांनाज् ४ fir दाखल केले, ६ जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. या दंगलप्रकरणी जवळपास ३०० हून अधिक सोशल मीडिया अकाऊंटची तपासणी केली. यामध्ये १४० अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट आणि व्हिडिओ आढळून आले असल्याची माहिती नागपूर सायबर क्राईमचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. आहे. त्यातून भयानक सत्य समोर आले. On the role of accused Faheem Khan in Nagpur violence, Cyber DCP Lohit Matani

लोहित मतानी म्हणाले :

नागपूर दंगल प्रकरणात नागपूरच्या बाहेरच्या अकाऊंटवरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचे दिसले. त्यातून दंगलीचे समर्थन केले होते. सर तन से जुदा अल्ला हू अकबर च्या घोषणा देऊन आज जास्त भडकवायचा प्रयत्न केला होता. असल्या या पोस्ट करणाऱ्या सगळ्या सोशल मीडिया अकाऊंटची तपासणी सुरू असून ते देशाबाहेरचे आहेत का??, याचीही तपासणी सुरू आहे. याचबरोबर दंगलीचा मुख्य आरोपी फहीम खान याच्याही सोशल मीडिया अकाऊंटची तपासणी करण्यात आली आहे. त्याच्या खात्यावरही आक्षेपार्ह मजकूर आढळला असून सायबर विभागाने त्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल

गुन्हे क्र. ३०/२५ मध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांच्या विरोधात जो हिंसाचार झाला, त्याचे समर्थन करून काही जणांनी चिथावणी दिली. या हल्ल्याचे समर्थन करताना काही कमेंट केल्या गेल्या, ज्यामुळे दंगलीला आणखी हवा मिळाली. ज्या लोकांनी अशा कमेंट केल्या त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. फहीम खानसह ६ जणांवर सध्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला असून त्यात आणखी वाढ होऊ शकते.

दंगलीत बांगलादेशच्या अँगलचा तपास केला जात आहे. एखाद्याने पोस्टमध्ये बांगलादेश लिहिले म्हणजे बांगलादेशचा संबंध लावता येत नाही. त्यासाठी सखोल तपास करावा लागेल.

नागपूर दंगलीप्रकरणी आतापर्यंत ४ एफआयआर दाखल केले असून त्यात ५० हून अधिक आरोप आहेत. पास प्रक्रिया जशी पुढे सरकेल तसे आणखीही काही एफआयआर दाखल केले जातील‌.

On the role of accused Faheem Khan in Nagpur violence, Cyber DCP Lohit Matani

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात