प्रतिनिधी
पुणे : ठाकरे – पवारांचे महाविकास आघाडी सरकार वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे चर्चेत आहे. यातले सगळ्यात मोठे प्रकरण सचिन वाझेचे झाले आहे. मुंबईतील हॉटेल रेस्टॉरंट आणि बार मालकांकडून 100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात सचिन वाझे सध्या कोठडीत आहे. On the occasion of Sachin Vaze Ajit Pawar remembered Bofors
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सचिन वाझे आणि बोफोर्स प्रकरण आठवले कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, पूर्वी ग्रामीण भागात कोणताही भ्रष्टाचार उघडकीस आला की त्याला बोफोर्स म्हणायचे. बोफोर्स इथ उघड झालं, तिथे उघड झालं, असं ग्रामीण भागात बोललं जायचं. आता त्याच्या ऐवजी याचा सचिन वाझे झाला, त्याचा सचिन वसे झाला असं ग्रामीण भागात बोलले जात आहे, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली.
आम्हाला कुठून बुद्धी आठवली आणि सचिन वाझेला सेवेत घेतला!!, असा टोला अजित पवारांनी आपल्याच सरकारला लगावला. मात्र कायदा आपले काम करतो आहे. सचिन वाझे बद्दल जे काही कायद्यानुसार असेल ते होईलच पण एका सचिन वाझेमुळे सगळ्या पोलीस दलाची बदनामी झाली आहे. ती टाळायला हवी होती, अशी टिप्पणी अजित पवार यांनी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App