प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजना आजपासून सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या योजनेचा दूरदृश्य प्रणालीद्वारे विस्तार करण्यात आला. On the occasion of Maharashtra Day, Balasaheb Thackeray started his clinic initiative in 317 talukas
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर येथून, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत उस्मानाबाद येथून, तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर त्या – त्या जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणांहून दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींसमवेत सहभागी झाले.
आपल्याला कोरोनाने आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणाचा धडा दिला आहे. छोट्या छोट्या आजारांवरील उपचारासाठी मोठ्या रुग्णांलयांचा ताण कमी करावा लागेल. या उद्देशाने आणि गरजूंना घराजवळ उपचाराची सुविधा मिळवून देण्याची गरज लक्षात घेऊन आपण ठाणे येथून या योजनेची सुरवात केली होती. त्याची अंमलबजावणी मुंबईमध्ये सुरू केली आणि आता संपूर्ण राज्यात आपला दवाखाना सुरू होत आहे. या योजनेतून ३० विविध चाचण्या मोफत करण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App