राज्यात वेगाने वाढू लागली ओमिक्रॉनबाधितांची संख्या


विशेष प्रतिनिधी

मुंबई – राज्यात रविवारी तब्बल २०७ ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली. रुग्णांपैकी १५५ बी जे वैद्यकीय महाविद्यालय; तर ५२ रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने कळवले आहेत. त्यात सांगली ५७, मुंबई ४०, पुणे पालिका २२, नागपूर २१, पिंपरी-चिंचवड १५, ठाणे पालिका १२, कोल्हापूर ८, अमरावती ६, उस्मानाबाद ५, बुलडाणा-अकोला प्रत्येकी ४, गोंदिया ३, नंदुरबार-सातारा-गडचिरोली प्रत्येकी २, औरंगाबाद, जालना, लातूर आणि मिरा-भाईंदर प्रत्येकी १ रुग्ण नोंदवला गेला. Omicron patiants increasing in state

आजवर राज्यात एकूण १,२१६ ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली. यातील २६ रुग्ण हे इतर राज्यांतील; तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहेत. ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत; तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत.



मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत आढळलेल्या रुग्णांपैकी ४५४ रुग्णांना त्यांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजवर ३,८६८ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ९७ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

Omicron patiants increasing in state

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात