प्रतिनिधी
नवी दिल्ली : राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणात वरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस वरील हल्लाबोलचा दुसरा अंक सादर केला. त्यांच्या भाषणात त्यांनी 50 वेळा काँग्रेसचे नाव घेत विविध मुद्द्यांवर काँग्रेसला ठोक ठोक ठोकले.Old Sharad Pawar’s love for Prime Minister Modi erupted while speaking Congress in Rajya Sabha
पण त्याच वेळी पंतप्रधान मोदींचे जुने शरद पवार प्रेम उफाळून आले. कोरोना महामारी संदर्भात सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या? सर्व देशाला बरोबर घेऊन जाण्यासाठी कसे प्रयत्न केले?, याचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, की विरोधी बाकांवर बसलेल्या सदस्यांनी अन्य कोणाकडून नाही तर निदान शरद पवार यांच्याकडून तरी शिकावे!! केंद्र सरकारने करोना काळात सर्वपक्षीय बैठका घेतल्या.
परंतु या बैठकींना हजर राहायचे नाही, असे काँग्रेसच्या नेत्यांनी ठरवले होते. मात्र तो युपीए अर्थात संयुक्त पुरोगामी आघाडीचा निर्णय नसल्याचे सांगत शरद पवार सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहिले होते. त्यांनी अनेक मौलिक सूचना सरकारला केल्या होत्या, याकडे पंतप्रधान मोदींनी सदनाचे लक्ष वेधले. काँग्रेसला टोचताना ते म्हणाले सत्ताधारी भाजपकडून नव्हे, तर निदान शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून तरी शिका की कोरोनासारख्या गंभीर संकट काळामध्ये पक्षीय विचार बाजूला ठेवून कसे वागायचे असते ते…!!
मोदींचे जुने पवार प्रेम
मोदींचे हे पवार प्रेम फार जुने आहे. ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारकडे कोणतेही काम घेऊन यायचे असल्यास ते पवारांकडे जात असत. पवार देखील मोदींची स्तुती करताना काँग्रेसच्या रागाची पर्वा करत नाहीत. शरद पवार यांनी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना दिलेल्या मुलाखतीत एक मुद्दा सांगितला होता. नरेंद्र मोदी यांच्यावर राजकीय आकसाने कारवाई केली जाऊ नये असे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि आपले मत होते. मंत्रिमंडळातले अनेक सहकारी आमच्या विरोधात होते. परंतु आम्ही नरेंद्र मोदींवर कारवाई होऊ दिली नाही, असे शरद पवार म्हणाले होते. मोदींनी देखील अनेकदा पवारांचा उल्लेख काँग्रेसला टोचण्यासाठी केला आहे. आज राज्यसभेत त्याच मुद्याचे त्यांनी रिपीटेशन केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App