जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील साेमाटणे टाेलनाक्यास विरोध करत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी माेठा मार्चा शनिवारी काढला. आयाआरबीने १० मे पर्यंत टाेलनाका बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. तसेच आजपासून या टोलनाक्यावर कोणीही टोल भरू नये अशी घोषणा आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे -पुणे-मुंबई महामार्गावरील वडगाव मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे, सोमाटणे व इतर गावातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी शनिवारी सकाळी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील साेमाटणे टाेलनाक्यास विरोध करत माेठा मार्चा काढला. आयाआरबीने १० मे पर्यंत टाेलनाका बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. तसेच आजपासून या टोलनाक्यावर कोणीही टोल भरू नये अशी घोषणा आंदोलनकर्त्यांनी केली आहे.Old pune Mumbai highway all party members opposed the somatne toll plaza and decided not anyone pay the toll
शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तळेगाव येथील लिंबफाटा याठिकाणी दाेन ते अडीच हजार आंदोलक एकत्रित जमले त्यानंतर दीडकीलाेमीटर अंतरावर महामार्गाने चालत ते साेमटणे फाटयाजवळील टोलनाका येथे आले.भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आदी पक्षांचे सदस्य या आंदोलनात सहभागी झाले होते.याप्रकारामुळे जुन्या महामार्गावरील वाहतूक तासभर विस्कळीत झाल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, राजकीय पक्षाचे सदस्य आणि रहिवाशांनी दावा केला आहे की, हा अवैध टोलनाका आहे आणि टोल वसूल केला जाऊ नये. त्यानंतर आंदोलकांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे पोलिस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितले की,आयआरबी कंपनीचे अधिकारी या टाेलनाक्याच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे टोल वसूल करत असल्याचा आंदोलकांचा दावा आहे. 10 मे पर्यंत टोलनाका बंद करण्याची मागणी सरकारी अधिकाऱ्यांना निवेदनात करण्यात आली आहे अन्यथा ते त्यांचे आंदोलन अधिक तीव्र करतील असा इशारा ही देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आणि महामार्ग पाेलीस , पुणेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 150 हून अधिक पोलीस हवालदार, 15 पोलीस निरीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकारी बंदोबस्तावर तैनात केले होते. या आदाेलनामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक अन्य पर्यायी रस्त्याने वळविण्यात आली हाेती.निवेदन दिल्यानंतर आंदोलक शांततेत घटनास्थळावरून निघून गेले.
टोल हटाव कृती समितीचे मिलिंद अच्युत म्हणाले, संबंधित टोल नाका बेकायदेशीर असल्याचा आम्ही अभ्यास केला आहे. ५ सप्टेंबर २००६ रोजी सरकारचे एक परिपत्रक आले आणि हा टोल नाका उभा राहिला. केंद्रीय वाहतूक मंत्री यांनी सांगितले की,महामार्गावरील दोन टोलनाका मधील अंतर हे कमीतकमी ६० किलोमीटर पाहिजे. याठिकाणी ते ३९.५ किलोमीटर अंतर आहे.
याबाबत आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला त्यावेळी समजले की, तो बीओटी तत्वावर एमएसआरडीसी ला देण्यात आला आहे. राज्य सरकारच्या निर्देशांनुसार नगर परिषदेचा हद्दीतून महामार्ग जात असेल तर टोल आकारण्यात येवू नये परंतु याठिकाणी तो तीन किलोमीटर अंतरावर असल्याने चुकीच्या पद्धतीने टोल वसूल केला जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App