विशेष प्रतिनिधी
मुंबई : विराग मधुमालती ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहेत. 25 वर्षांच्या अथक परिश्रम आणि संशोधनानंतर त्यांनी तब्बल 17 लाख संगीत अलंकारांची निर्मिती केली असून याचा 2 लाख पानांचा आणि चक्क 40 फूट उंच जाडीचा संगीतग्रंथ “संगीत का महासागर” या नावाने निर्मित केला जाणार आहे. अशाप्रकारचा 40 फुट उंच म्हणजेच एकंदरीत 4 मजली इमारतीच्या उंचीचा हा संगीतग्रंथ जगात एकमेव असणार आहे. “Ocean of music”! 25 years – 2 lakh pages – 4 storey building-thick music book: The world’s first big book – Virag Madhumalati’s new world record
अथक परिश्रम आणि संशोधनानंतर त्यांनी तब्बल 17 लाख संगीत अलंकारांची निर्मिती केली असून याचा २ लाख पानांचा आणि चक्क ४० फूट उंच जाडीचा संगीतग्रंथ “संगीत का महासागर” या नावाने निर्मित केला जाणार आहे. अशाप्रकारचा 40 फुट उंच म्हणजेच एकंदरीत 4 मजली इमारतीच्या उंचीचा हा संगीतग्रंथ जगात एकमेव असणार यात निश्चितच काही शंका नाही. “संगीत का महासागर” या ग्रंथातील सर्व 17 लाख संगीत अलंकाराचा मजकुर लिहून झाला असून त्याबद्दलची चर्चा आता सर्वत्र सुरु झाली आहे.
विश्वविक्रम करण्यात ज्यांचा हातखंडा आहे असे विराग मधुमालती यांनी त्यांच्या या नव्या विश्वविक्रमासाठी 1996 पासून रियाझ आणि अलंकारांच्या निर्मितीसाठी अभ्यास करत आहे. कलेचे जाणकार विराग मधुमालती यांनी गेली २५ वर्ष कलेसाठी अर्पित केली आहेत आणि इतक्या वर्षांच्या मेहनतीचे यश म्हणजेच हा संगीतग्रंथ आहे असे ते सांगतात.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App