OBC Mahasangh : ओबीसी महासंघाचा मराठा आरक्षणाला विरोध:नागपुरात साखळी उपोषण सुरू; मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास नकार

OBC Mahasangh

विशेष प्रतिनिधी

नागपूर : OBC Mahasangh मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. नोंदी मिळालेल्या ५४ लाख मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची त्यांची मागणी आहे. ते पाहता सरकार दबावात निर्णय घेण्याची भीती ओबीसी समाजात आहे. मात्र दबावात येऊन निर्णय घेतल्यास वा तसे दिसल्यास आम्हीही आंदोलनाची तीव्रता वाढवू, असा रोखठोक इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी माध्यमांशी बोलताना दिला. सरकारने कुणबी आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न केल्यास आम्हीही मुंबईत धडकू, असा सज्जड इशाराही तायवाडे यांनी यावेळी दिला.OBC Mahasangh

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. सरकारने दबावात निर्णय घेत असल्याचे दिसल्यास आम्हीही आंदोलन तीव्र करू, असा इशारा तायवाडे यांनी दिला. राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे येथील संविधान चौकात साखळी उपोषण सुरू करण्यात आले. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. पहिल्या दिवशी गडचिरोलीचे खासदार नामदेव किरसान, शिक्षक आमदार सुधाकर आडबाले, माजी आमदार सुधाकर देशमुख व अशोक धवड यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन समर्थन दिले.OBC Mahasangh



सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न केल्यास आम्हीही मुंबईत धडकू असा सज्जड इशारा तायवाडे यांनी दिला. कोणत्याही परिस्थितीत मराठ्यांना ओबीसीतूत आरक्षण देण्यास विराेध असल्याचे सांगितले. सरकार आमच्या मागण्या मान्य करीत नाही तोपर्यत साखळी उपोषण सुरूच राहिल. ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाही, असे तायवाडे यांनी सांगितले. मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये व सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये ही ओबीसी समाजाची आग्रहाची मागणी आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असे आश्वासन सरकारने मागील आंदोलना दरम्यान दिले होते. त्यावर सरकारने कायम रहावे हीच आमची मागणी आहे. सरकार काय भूमिका घेते हे पाहून बेमुदत व पुढे अन्नत्याग आंदोलन करू. पण कोणत्याही परिस्थितीत संवैधानिक आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असे तायवाडे यांनी सांगितले.

OBC Mahasangh Protests Maratha Reservation Kunbi Certificates

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात