विशेष प्रतिनिधी
बीड : Lakshman Hake ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आज, 17 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये राज्याच्या समस्त ओबीसी समाजाची एक मोठी महाएल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या सभेला राज्यभरातील महत्त्वाचे ओबीसी नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. सभेच्या आधी छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके यांच्यात हॉटेल सनराईज येथे बैठक झाली.Lakshman Hake
महाएल्गार सभेत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, अनेकांना या सभेचे निमंत्रण दिले नाही म्हणून अनेकजण नाराज आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो, अधिकार के लढाई में निमंत्रण नहीं भेजा करते. जिनका जमीर जिंदा हें, वो खुद समर्थन में आजाते हें. हमारे हक पर जहा आच आये तो टकराना जरूरी हें. मी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या सभेत काही लोक घुसवले जाण्याची शक्यता आहे. मी असेही ऐकले की काही लोक सुतळी बॉम्ब घेऊन आले आहेत. ते काहीतरी गडबड करतील, त्यांना तिथेच दाबायचं आणि गपचूप पोलिसांच्या हवाली करायचं.Lakshman Hake
काय म्हणाले लक्ष्मण हाके?
या सभेत बोलताना अनेक नेते उपस्थित होते. मनोज जरांगे यांच्यावर यावेळी जोरदार टीका करण्यात आली. लक्ष्मण हाके यावेळी बोलताना म्हणाले, भुजबळ साहेब आणि धनंजय मुंडे यांची जोडी व्यासपीठावर बघून आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आठवण झाली. गोपीनाथ मुंडे यांनी जातीनिहाय जनगणना करावी या मागणीसाठी दिल्लीतील संसदेत आवाज उठवला होता. आपण बीड जिल्ह्यात सर्वजण उपस्थित आहात, भुजबळ साहेब इथे दोन दिवस झाले सांगितले जात होते की भुजबळांना बीडमध्ये येऊ देणार नाही. भुजबळ साहेब तर लांब त्यांच्या कार्यकर्त्याच्या केसाला सुद्धा धक्का लाऊ शकत नाहीत.
राज्यातला मागासवर्ग आयोग बंद करा
पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, मी एक जीआर घेऊन आलो आहे, त्यातले एकच वाक्य मी वाचून दाखवतो. हा जीआर ओबीसींचे आरक्षण संपवणारा आहे. त्यात असे लिहिले आहे, मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी यासाठी शासन निर्णय घेत आहे. छगन भुजबळ साहेब तुम्ही सरकारमध्ये आहात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगा राज्यातला मागासवर्ग आयोग बंद करा. दुसऱ्यांदा सांगा की सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण नाकारले आहे. औरंगाबाद खंडपीठाने मराठा समाज आणि कुणबी एकच असल्याचे मानणे नाकारले आहे. त्यामुळे सरकारने जो जीआर काढला आहे, तो सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करणारा आहे.
मनोज जरांगे चौथी नापास
लक्ष्मण हाके पुढे म्हणाले, हा जीआर म्हणजे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न आहे. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरून या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या आरक्षणात माती कालवण्याचे काम इथल्या लोकनियुक्त सरकारकडून झाले आहे. हा जरांगे कोणावर टीका करतो छगन भुजबळ साहेबांवर करतो, धनंजय मुंडेंवर करतो. हा चौथी नापास गडी. मुख्यमंत्र्यांची आई-माय काढणारा हा माणूस. ज्या लोकांनी आमच्या आरक्षणाला विरोध केला त्यांना आम्ही घरी बसवले.
आरक्षण म्हणजे गरीबी हटावचा कार्यक्रम नाही
ओबीसीचे आरक्षण पाहिजे असेल तर तुम्हाला ओबीसीमध्ये जन्माला यावे लागेल. आमच्या चार पिढ्यांनी सामाजिक दुजाभाव भोगला आहे. आमच्या लोकांना ऊस तोडावा लागतोय. आरक्षण म्हणजे गरीबी हटावचा कार्यक्रम नाही. आरक्षण म्हणजे सामाजिक प्रतिनिधीत्वाचा कायदा आहे. किती संविधान सांगायचे आता? असा सवाल हाके यांनी उपस्थित केला. आमचे म्हणणे आहे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नका.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App