विशेष प्रतिनिधी
पुणे : OBC Leaders मुंबईतील मराठा आंदाेलनाला शह देत ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय पुण्यातील बैठकीत घेण्यात आला. वंशावळ समितीला मुदतवाढ जरांगे यांच्या दबावाखाली दिली गेली, अशी टीका करीत सरकार बेजबाबदार वागत आहे, असा संताप लक्ष्मण हाके यांच्यासह ओबीसी नेत्यांनी व्यक्त झाला.OBC Leaders
शनिवारी सकाळी ओबीसी समाजातील नेत्यांनी एकत्र येत पुण्यातील पत्रकार भवनाच्या सभागृहात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर हाके म्हणाले, संघर्ष यात्रा कुठून सुरू करायची, कधी सुरू करायची, याबाबत निर्णय घेणार आहोत. मंगेश सासणेंनी सांगितले की, मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले आहे, तरीही ओबीसी समाजाचे आरक्षण ओरबाडून घ्यायचा प्रकार सुरू झाला आहे. महाराष्ट्रात फक्त मराठा समाजच राहणार का, असा प्रश्न पडला आहे. बैठकीत पुण्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अरविंद तायडे, नांदेड जिल्ह्यातील उत्तम चव्हाण, अनिल कोळेकर, फलटणचे बापूराव शिंदे आदींनी आपापली भूमिका मांडली. सर्वांनी आंदोलनासाठी सोबत आहोत असा शब्द दिला.OBC Leaders
जरांगे तुम्ही तर आम्हा रयतेचे रक्षण करायला हवे
सासणे म्हणाले की, खरे तर जरांगे पाटील हे शिवाजी महाराजांच्या विचाराचे वारसदार आहेत. शिवाजी महाराजांनी सर्वांना सारखी वागणूक दिली हाेती. पण आज जरांगे यांची मागणी पाहिली तर ते शिवरायांच्या विचाराप्रमाणे वागतात का, असा प्रश्न पडतो. रयतेचे संरक्षण करण्याची त्यांची जबाबदारी आहे. पण तसे होताना दिसत नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App