विशेष प्रतिनिधी
पुणे : Laxman Hake आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मूळ ओबीसी उमेदवारांना तिकीट न दिल्यास संबंधित पक्षांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी ओबीसी नेते मंगेश ससाणे उपस्थित होते.Laxman Hake
लक्ष्मण हाके म्हणाले की, ग्रामीण भागातील ओबीसी समाज दुय्यम स्थानी आहे. नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्या असून, नगर परिषदेत ओबीसींसाठी 77 जागा राखीव आहेत. यापैकी मूळ ओबीसींना किती जागा मिळतात, यावर आम्ही लक्ष ठेवणार आहोत. याबाबत पक्षांना जाब विचारून जनजागृती केली जाईल आणि संबंधित पक्षा विरोधात काम केले जाईल.Laxman Hake
..तर ओबीसींनी बंडखोरी करावी
लक्ष्मण हाके म्हणाले की, ओबीसींनी आपले उपद्रव मूल्य दाखवले नाही, तर शिक्षण आणि नोकरीतील राजकारणाप्रमाणे राजकारणातील उरलेली पदेही गमावतील. ओबीसींना डावलून बोगस कुणबी किंवा धनदांडग्यांना तिकीट दिले जात असेल, तर ओबीसींनी बंडखोरी करून निवडणूक लढवावी, असे आवाहनही हाके यांनी केले.
..तर ओबीसी राजकारण संपुष्टात येईल.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि ओबीसी आरक्षणाबाबत बोलताना हाके यांनी, राज्य शासनाने 2 सप्टेंबर रोजी काढलेला जी आर आम्हाला मान्य नाही, असे स्पष्ट केले. यामुळे ओबीसी राजकारण संपुष्टात येईल. शरद पवार यांनी त्यावेळी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. पंचायतराज निवडणुकीत ओबीसी नेतृत्व तयार झाले नाही, तर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही ओबीसी नेतृत्व दिसणार नाही. आम्हाला भीक नको, तर हक्क हवा आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
भूमिका स्पष्ट करावी
मंगेश ससाणे म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार ओबीसींना निवडणुकीत डावलू नका असे म्हणत असतील, तर ओबीसींमध्ये बोगस कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर लढणाऱ्यांबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. पुण्यात 44 तर पिंपरी चिंचवडमध्ये 31 जागा ओबीसींसाठी राखीव आहेत. या पदांवर मूळ ओबीसींना विविध पक्ष जागा देणार आहेत का, हे स्पष्ट झाले पाहिजे. ओबीसींच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात उतरणार का, हे त्यांनी स्पष्ट करावे.
27 हजार जागा खाल्ल्या
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी संघटना समितीचे अध्यक्ष असून, त्यांना भाजपचे राज्य प्रभारी केले आहे. त्यामुळे ओबीसी समिती श्वेतपत्रिका कधी काढणार आहे, हे त्यांनी सांगावे. अनेक सर्वसाधारण प्रवर्गातील नेते ओबीसी जागेवर अतिक्रमण करून कुणबी प्रमाणपत्र काढत आहेत. ओबीसी प्रमाणपत्रांमुळे आम्हाला पाळण्यातच मारले जात आहे, असे ससाणे यांनी म्हटले. ओबीसींसाठी ज्या जागा नियमानुसार राखीव आहेत, त्याचे प्रमाण योग्यप्रकारे काढले जात नसल्याने राज्यात 27 हजार जागा निवडणूक आयोगाने खाल्ल्या आहेत. सर्वच पक्षांनी ओबीसींची फसवणूक करत त्यांची शिकार केली आहे, असा गंभीर आरोपही ससाणे यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App