विशेष प्रतिनिधी
मुंबई : Laxman Hake मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारच्या या निर्णयाला संविधानविरोधी आणि ओबीसी समाजाचे आरक्षण संपवणारा निर्णय म्हटले आहे. तसेच या निर्णयाविरोधात ओबीसी समाज न्यायालयीन तसेच रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचा इशाराही लक्ष्मण हाके यांनी दिला.Laxman Hake
लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, हा जीआर संविधान विरोधी आहे, ओबीसी समाजाचं आरक्षण संपवणारा हा निर्णय आहे. विरोधी निर्णय येऊन सुद्धा शासनाने सुप्रीम कोर्टांच्या गाईडलाईन, कोर्टात कंटेम्प करण्याचे काम केलेल आहे. मुळात शिंदे समितीचा अहवाल पक्षपाती करणारा आहे. तटस्थ राहून निर्णय घ्यायला हवा होता. या निर्णयामुळे ओबीसी आरक्षण आज संपुष्टात आलेले आहे. सरकार हतबल होतं, हतबलते पुढं ओबीसी आरक्षणाच्या नरडीचा घोट घेण्याचं कामं सरकारने केले आहे.Laxman Hake
रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा
हाके पुढे म्हणाले की, या जीआरला त्वरित स्थगिती मिळाली पाहिजे, त्यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई तर लढणारच, पण रस्त्यावर उतरूनही आंदोलन करू. ओबीसी समाजात 300 ते 400 जाती आहेत. आम्ही एकत्र येत नाही ही गोष्ट खरी आहे, पण या लढाईत आम्ही वार झेलत आहोत, दगड झेलत आहोत आणि खलनायक ठरत आहोत. हे चित्र पाहता आपण पुन्हा गुलामगिरीकडे ढकलले जात आहोत. आपण आता 200-300 वर्ष मागे नाही. बलुते आणि अलूते यांनी त्यांची त्यांची कामं करा, मेंढपाळांनी मेंढ्या राखा. वंजारी बांधवांनी ऊस तोडायला जा. बंजारा बांधवांनी तांडाच्या बाहेर येऊ नका. आपण परत गुलामीत जाणार आहोत.
आज ओबीसींचे आरक्षण संपले
ते पुढे म्हणाले की, पुढच्या दरवाजातून एन्ट्री मिळत नाही, म्हणून मागून भगदाड पाडा, दरवाजा तोडून टाका आणि खुल्लम खुल्ला सगळं करा. ओबीसी म्हणजे महाराष्ट्रमधले सगळे असा या जीआरचा अर्थ निघतो. आज ओबीसींचे आरक्षण संपले आहे. बाबासाहेब आंबेडकर, शाहू, महात्मा फुले यांना सामाजिक न्याय अपेक्षित होता. गावोगाव ओबीसी समाजाच्या हातून सरपंचपद, झेंडा फडकवण्याचा अधिकार काढून घेण्याचे काम या सरकारने केले आहे. शासनाचा डीएनए खरंच ओबीसींसाठी आहे का? या प्रश्नाचे सरकारने उत्तर द्यायलाच हवा. नाहीतर भविष्यात गावच्या चावडीवर बसून गप्पा मारण्याचाही अधिकार ओबीसी समाजाकडे उरणार नाही.
पुन्हा गुलामगिरीत जा आणि जी हुजूर म्हणा
सरकारच्या या निर्णयाविरोधात लक्ष्मण हाके यांनी ओबीसींना एकजूट होण्याचे आवाहन केले आहे. कुठलातरी चौथी पास माणूस येतो, शासनाच्या बोकांडी बसतो. शासन हतबल होऊन असा निर्णय घेत आहे. उद्या गावातून आपल्याला हुसकवून लावलं जाईल. ओबीसींनो जर तुम्ही एकजूट नाही झाला, तर इथून पुढच्या काळात गावच्या चावडीवर येऊन गप्पा मारण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार राहणार नाही. पुन्हा गुलामगिरीत जा आणि पुन्हा जी हुजूर म्हणा. तुम्हाला माझ्या शुभेच्छा, असे लक्ष्मण हाके म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App