विशेष प्रतिनिधी
मुंबई : Laxman Hake मराठा आरक्षण जीआरविरुद्ध ओबीसी समाजाने एल्गार सुरू केला आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून गेले दोन दिवस जीआरची होळी करण्यात आली. जीआर फाडण्यात आला. शुक्रवारी सकल ओबीसी समाजातर्फे औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावरील येळी फाटा येथे शुक्रवारी ३ तास रास्ता रोको करण्यात आला. त्याआधी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीआरची होळी करण्यात आली होती.Laxman Hake
दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शुक्रवारी बारामतीतून संघर्ष यात्रा सुरू केली. त्यात त्यांनी शरद पवारांवर कठोर हल्ला चढवला. दरम्यान, महायुतीच्या मंत्र्यांनी जीआरवरून संभ्रम वाढवणे सुरूच ठेवले आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, फक्त गॅझेटमध्ये कुणबी अशी नोंद आहे म्हणून जात प्रमाणपत्र मिळणार नाही. त्यासाठी पूर्ण प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.Laxman Hake
जरांगेंचे गाव असलेल्या आंतरवाली सराटीत पाच दिवसांपासून ओबीसी बांधवांचे आमरण उपोषण सुरू होते. ओबीसी उपसमितीचे सदस्य आणि मंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी दूरध्वनीद्वारे उपोषणकर्त्यांशी संवाद साधल्यावर उपोषण स्थगित केले. स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेने ओबीसी आंदोलनाला पाठिंबा दिला. ओबीसी मंत्री, आमदार, खासदार, माजी मंत्री, माजी खासदार आंदोलनात सहभाग घेत नाहीत यावर नाराजीही व्यक्त केली.Laxman Hake
मराठा आरक्षण जीआरविरोधात रास्ता रोको
बारामतीत लक्ष्मण हाके म्हणाले की, मंडल आयोग शरद पवार यांनी लागू केला असं कोणी म्हटलं तर त्याचं कानफाड फोडा. पवारांनी कुटुंबाच्या बाहेर कारखाने जाऊ दिले नाहीत. कुटुंबाच्या बाहेर आमदारकी, खासदारकी जाऊ दिली नाही. सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा कारखाना असं काम हे करत आहेत. सत्ता कोणाचीही असो, अजित पवार मंत्रिमंडळात असतातच. पुढच्या निवडणुकीत डुप्लिकेट ओबीसी विरुद्ध डुप्लिकेट ओबीसी अशी लढत होईल.
जात प्रमाणपत्राला आव्हान दिले जाऊ शकते
नागपूर | हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीवरून मंत्री छगन भुजबळांची नाराजी नाही. आक्षेप आणि संभ्रम आहे, तो दूर करू. तसेच हैदराबाद गॅझेटमध्ये केवळ नोंद मिळाली म्हणून त्याआधारे सर्टिफिकेट दिले जाणार नाही. अधिकारी हे नियमाप्रमाणे सही करतील. कुठलेही कास्ट सर्टिफिकेट चॅलेंज होऊ शकते, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले, तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, विदर्भातील ओबीसी नेत्यांची बैठक ६ सप्टेंबर रोजी बैठक बोलावली आहे. मात्र, भाजप दोन्ही समाजाची मतं लाटण्यासाठी त्यांना धूर्तपणे खेळवत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App