विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis आगामी विधानसभा निवडणुकीची तारीख आता काही दिवसांवर आली आहे. या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी आता जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांची नावेदेखील जाहीर करणे सुरू असून ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा महायुतीचे सरकारच येईल असा दावाही त्यांनी केला आहे.Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, हरियाणाबाबत सगळे पोलपंडित सांगत होते भाजपचा दारुण पराभव होणार. पण भाजपाला प्रचंड बहुमत मिळाले. त्यामुळे सकाळी टीव्हीसमोर बोलणारे दुपारी काय बोलू या संभ्रमात पडले होते, असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला काही प्रमाणात यश मिळवता आले. फेक नरेटिव्हच्या भरवशावर त्यांनी यश मिळवले, असे ते म्हणाले.
लोकसभेच्या निवडणुकीत व्होट जिहाद झाला
ते म्हणाले, राहुल गांधींनी आरक्षण कसे संपवणार याचा फॉर्म्युला सांगितला. नाना पटोले त्यांचीच री ओढत आहेत. तसेच लोकसभेच्या निवडणुकीत व्होट जिहाद हा महत्त्वाचा घटक होता. सगळी धार्मिक स्थळे आणि धर्मगुरू व्होट जिहादचा नारा देत होते. आता याचा फायदा होणार नाही. तसेच व्होट जिहादमुळे बहुसंख्य समाजाच्या लक्षात आले की मोदी नकोत म्हणून व्होट जिहाद करणार असेल तर मतपेटीतून उत्तर देता येईल. त्यामुळे फेक नरेटिव्ह आता चालणार नाही.
लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
लाडकी बहीण योजनेबाबत मी हे सांगू इच्छितो की आमच्या विरोधकांचं कन्फ्युजन बघा. लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोलमडणार, निवडणुकीनंतर योजना बंद होणार. दुसरीकडे तेच भाषणांमध्ये सांगतात की, हे 1500 रुपये देतात आम्ही निवडून आलो तर 2000 रुपये देऊ. यांच्याकडे खजिना आहे का? पैशांचं झाड आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App