विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण हा विषय महाराष्ट्रात टाकल्यानंतर गावागावांमध्ये जाती जातींमध्ये संघर्ष उभा राहिला आता हा संघर्ष संपवण्यासाठी संवाद निर्माण करण्याची गरज आहे असे सांगत शरद पवारांना संवादासाठी बाहेर पडण्याची उपरती झाली आहे. Now sharad pawar will move out in maharashtra to initiate dialogue
आधीच्या फडणवीस सरकारने आणि सध्याच्या शिंदे – फडणवीस सरकारने 10 % मराठा आरक्षण दिले. परंतु, ते आरक्षण अमान्य करत मनोज जरांगे यांनी ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण देण्याचा हट्ट धरला. त्यानंतर महाराष्ट्रात मोठा संघर्ष उफाळला. गावागावांमध्ये मराठा विरुद्ध इतर जाती एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या. मनोज जरांगे सातत्याने फक्त देवेंद्र फडणवीस आणि भाजपवरच निशाणा साधत होते. त्यानंतर भाजपने आक्रमकपणे मनोज जरांगे यांच्या पाठीशी नेमकी कोणती “अदृश्य शक्ती” आहे??, असे बोचरे सवाल करत खुद्द जरांगे आणि पवार छुप्या युतीला एक्सपोज केले. दरम्यानच्या काळात छगन भुजबळ शरद पवारांना भेटून आले. त्यानंतर देखील मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपने त्यांना टार्गेट करतच राहिले, पण भाजपने शरद पवार आणि मनोज जरांगे यांची छुपी युती एक्सपोज करणे सोडले नाही. भाजपच्या नेत्यांनीही मनोज जरांगे यांना अरे तुरे करतच प्रत्युत्तरे द्यायला सुरुवात केली.
त्यानंतर आता मनोज जरांगे यांची भाषा थोडीशी बदलून ते शरद पवारांना देखील प्रश्न विचारायला लागले. या पार्श्वभूमीवर शरद पवारांना आता महाराष्ट्रात संवाद निर्माण करण्यासाठी बाहेर पडावे लागेल, अशी उपरती झाली आहे. एबीपी माझाच्या महा कट्ट्यावर बोलताना त्यांनी महाराष्ट्रात संवादासाठी बाहेर पडावे लागेल, असे वक्तव्य केले.
शरद पवार म्हणाले :
महाराष्ट्रातील जालना, बीड यासारख्या जिल्ह्यांत अस्वस्थता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यावर मी शांतपणे जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधणार आहे. कटुता, अवविश्वासाचं चित्र दसतंय. हे भयावह आहे. मी कधीही महाराष्ट्रात असं ऐकलेलं नाही. एका समाजाचं हॉटेल असेल, तर दुसऱ्या समाजाचे लोक तिथं चहा घ्यायलाही जात नाहीत, असं मी महाराष्ट्रात कधीही ऐकलेलं नाही. हे काहीही करून बदललं पाहिजे. लोकांमध्ये विश्वास वाढवला पाहिजे. संवाद वाढला पाहिजे. आमच्यासारख्या लोकांनी यासाठी जीव ओतून काम केलं पाहिजे.
मूळात संवाद ठेवायला पाहिजे. आज संवाद संपला आहे. सार्वजनिक जीवनात जेव्हा संवाद थांबतो तेव्हा चुकीच्या समजुती वाढतात. त्यामुळे संवाद गरजेचा आहे. या प्रक्रियेत आमच्यासारख्या लोकांनी यात अधिक लक्ष द्यायला हवं.
गंमत अशी आहे, की दुर्दैवाने दोन वेगवेगळे वर्ग पडले आहेत. त्या दोन वर्गांना कोणी-कोणी काय तरी सांगितलं आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी दोन बाजू घेतलेल्या आहे. एका गटाने ओबीसींची बाजू घेतली आहे, तर एका गटाने मराठा आंदोलकांची बाजू घेतली आहे. हे योग्य नाही. आपण सामंजस्य कसं निर्माण कसं करू यावर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे संवाद वाढवणं गरजेचं आहे. केंद्र सरकारने प्रकरणात अजिबत लक्ष घातलेलं नाही.
म्हणजे एकीकडे संवाद वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे, असे सांगत महाराष्ट्रात संवाद निर्माण करायला निघणाऱ्या शरद पवारांनी महाराष्ट्रातल्या ओबीसी विरुद्ध मराठा वादामध्ये केंद्र सरकारलाही ओढले आहे. त्यामुळे शरद पवार महाराष्ट्रात असलेला निर्माण करणार असलेल्या संवाद मनमोकळा आणि निर्भेळ राहणार की त्या संवादातून आगीत तेल ओतले जाऊन केंद्र सरकार विरुद्धही आग भडकणार??, असा सवाल तयार झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App