विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून अजित पवार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला निघून गेल्यानंतर दोन्ही काका – पुतणे कधीतरी एक होतील, अशा अटकळी अनेकांनी बांधल्या. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाले. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पराभूत झाली. त्यावेळी तर अजित पवार केव्हाही शरद पवारांबरोबर Sharad Pawar निघून जातील असेही बोलले गेले.
पण विधानसभा निवडणुकीनंतर पूर्ण चित्रच पालटले. ते माजी आमदार बच्चू कडू यांनी उघडपणे बोलून दाखवले. आता केवळ शरद पवारांचे आमदारच नाहीत, तर खुद्द शरद पवारच अजितदादांकडे निघून जातील असे वाटायला लागले आहे, अशा शब्दांमध्ये बच्चू कडू यांनी शरद पवारांची खिल्ली उडवली. Sharad Pawar
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे, त्याबद्दल बच्चू कडू यांना प्रश्न विचारल्याबरोबर बच्चू कडू उद्गारले, फक्त त्यांचे आमदारच नाहीत, तर आता खुद्द शरद पवारच अजितदादांकडे निघून जातील असे वाटायला लागले आहे!!
शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात आजही विस्तव जात नाही. दोन्ही शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते प्रामाणिकपणे एकमेकांविरोधात लढत राहिलेत. कुणाल कामरा विडंबन प्रकरणात तर दोन्ही शिवसेना एकमेकांवर शिंगे रोखून उभे राहिल्याचे चित्र समोर आले. पण त्या उलट शरद पवार आणि अजित पवार मात्र भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा लाभ घेण्यासाठी एकमेकांवर टीका करण्याऐवजी एकमेकांशी जुळवून घेण्यात पुढे आलेत. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी शरद पवारच अजितदादांकडे निघून जातील, अशा शब्दांमध्ये त्यांची खिल्ली उडवून राष्ट्रवादी संस्कारितांचे वाभाडे काढले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App