प्रतिनिधी
कराड : देशात आणि महाराष्ट्रात लँड जिहाद किती मोठ्या प्रमाणावर फैलावला आहे, याचे उदाहरण आता महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी जवळ आढळले आहे. Now an illegal tomb near Yashwantrao Chavan’s mausoleum on Preetisangam in Karad
सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये कृष्णा आणि कोयना नद्यांच्या संगमावर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे. ही समाधी म्हणजे कराडचा सांस्कृतिक वारसा आहे. असे असतानाही प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अत्यंत पवित्र अशा प्रीतीसंगमाच्या मागच्या बाजूस हजरत जाफर अली बाबा या नावाने अवैध मजार बांधण्यात आली आहे. आता गुगल मॅपवरही या मजारीचे लोकेशन दाखवले जात आहे.
असे असूनही प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसले आहे. हे अतिशय संतापजनक आहे. आतातरी शासनाने तातडीने ही अवैध मजार हटवावी, तसेच या अवैध बांधकामाला कारणीभूत असलेल्या प्रशासकीय अधिकार्यांवर अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
महाराष्ट्रात लव्ह जिहादची 1 लाखांहून जास्त प्रकरणे, तरीही आव्हाड, आझमींसह विरोधकांचा कायद्याला आक्षेप!!
कराडमध्येही लँड जिहाद
समितीने शासनाला पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर कराड नगरपालिकेने याच कृष्णा-कोयनेच्या प्रीतीसंगमावर 7.5 एकर जागेवर हे स्मारक बांधले. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या ठिकाणी अवैध मजार बांधण्यात आली आहे. महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या अवैध मजारी, दर्गे, पीर उभे राहिल्याचे निदर्शनास येत आहे. अशा प्रकारे मजारी बांधून जागा बळकावणे म्हणजे हा लँड जिहादच आहे.
ही मजार भाव-भक्ती आणि संस्कृती यांचा वारसा असलेल्या प्रीतीसंगमाच्या मागच्याच बाजूस असल्याने या पर्यटनाचे आकर्षण असणार्या स्मारकाच्या सौंदर्यास गालबोट लागले आहे. शासनाने कराड नगरपालिकेस ही मजार तात्काळ हटवण्यासाठी सूचना द्याव्यात. शासन आणि प्रशासन यांनी समयमर्यादेत ही कारवाई करावी आणि अवैध मजार त्वरित हटवावी. तसेच या अवैध दर्ग्याची गुगल मॅपवरील नोंद रहित होण्यासाठीही योग्य ती कारवाई करावी, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App