मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश; ज्येष्ठ नागरिकांबाबत अन्य मुद्द्यांवरही विशेष बैठकीत झाली चर्चा
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे १७ जून मे रोजी ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य तपासणी, शासनामार्फत करणेबाबत व अन्य विषयांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष यांच्यासह सर्व जबाबदार प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. Now all senior citizens above 60 years will have free health checkup twice a year
या बैठकीचे प्रास्ताविक महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी व सोयीसुविधांबाबत घेण्या आलेल्या निर्णयांबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. तसेच, या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्या व अन्य मुद्द्यांवर चर्चा करून, संबंधित विभागाना कार्यावाहीबाबत निर्देशही दिले गेले.
यामध्ये प्रामुख्याने राज्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालये, राज्य कामगार विमा तसेच महानगर पालिका, नगर पालिकेच्या अख्त्यारितील सर्व रुग्णालये यांच्या मार्फत, ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यासाठी सर्व ज्येष्ठ नागरिकांना आभा कार्ड देण्यात येवून त्यांना सुपर स्पेशॅलिटी दवाखान्यात सुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
दुर्दैवाने काही आजार आढळून आल्यास त्यावर महात्मा फुले जनआरोग्य योजनामधून मोफत उपचार मिळावेत यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनामध्ये अटी व शर्ती मध्ये सर्व ज्येष्ठांचा समावेश करावा. तसेच, ज्येष्ठनागरिकांची राज्यातील १.५०कोटी संख्या विचारात घेता सर्व रुग्णालयामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी डॉक्टर व संबंधित चाचणी आठवड्यातील दोन दिवस राखीव ठेवण्यात यावेत. Palliative care ward यांची टप्प्याटप्प्यात वाढ करण्यात यावी.
ज्येष्ठना नागरिकांवरील सध्याच्या होत असलेल्या कौटुंबिक, सामाजिक अत्याचार लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष स्थापन करावे. ज्येष्ठ नागरिक धोरणामध्ये उल्लेक केल्याप्रमाणे ज्येष्ठांसाठी स्वतंत्र मंत्रालय, आयुक्तालय निर्मिती करावी. वृद्धाश्रमातील व्यक्तींना, संस्थाना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्यात यावी. ज्येष्ठ नागरिकासांठी विरंगुळा केंद्रांची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे, त्याबाबतही अंमलबजावणी केली जावी.
महात्मा फुले जन आरोग्य योजना व इतर शासकीय आरोग्य योजनेवर राज्य, जिल्हा व तालुका सनियंत्रण समितीवर FESCOM ज्येष्ठ नागरिकांचे दोन प्रतिनिधी घेण्यात यावेत जेणेकरून ज्येष्ठांच्या आरोग्य समस्या सोडविण्यास मदत होईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App