विशेष प्रतिनिधी
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदनी येथील परमिटरूमवरील दरोड्यासह मंद्रूप ठाण्याच्या हद्दीतील तीन घरफोड्या आणि कामती ठाण्याच्या हद्दीतील एक घरफोडी करणारा सराईत कुविख्यात आंतरराज्य गुन्हेगार पोलिसांना मिळून आला. Notorious interstate criminal police nets; Action of Solapur Rural LCB at Nandani
त्याच्याकडून ८ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात सोलापूर ग्रामीण एलसीबी पथकाला यश आले आहे.दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदनी येथील हॉटेल निसर्ग वर ६ फेब्रुवारी रोजी दरोडा पडला होता.यामध्ये फिर्यादी गंगाराम वाघमोडे यांच्या खिशातील २० हजार रुपये आणि इंपिरियल ब्लू कंपनीचे २८ दारूचे बॉक्स असे एकूण २ लाख ३१ हजार ६०० रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटला होता.
याबाबत तपास केला असता दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आणि त्याचे साथीदाराने हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्या अनुषंगाने सापळा रचून त्यांना पकडण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App