विशेष प्रतिनिधी
पुणे : Nilesh Ghaywal’ पुणे शहरातील कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट पुणे पोलिस लवकरच रद्द करणार आहेत. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे. घायवळने बनावट कागदपत्रे आणि खोटी माहिती सादर करून हा पासपोर्ट मिळवल्याचे तपासात उघड झाले आहे.Nilesh Ghaywal’
नीलेश घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी ‘गायवळ’ असे नाव असलेली कागदपत्रे वापरली. ही कागदपत्रे त्याने अहिल्यानगर पोलिसांकडे सादर करून तत्काळ पासपोर्ट मिळवला. त्याने पासपोर्ट अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात, आपल्यावर राज्यात कोठेही गुन्हा दाखल नाही, अशी खोटी माहिती दिल्याचेही पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.Nilesh Ghaywal’
नीलेश घायवळ सध्या 11 सप्टेंबरपासून परदेशात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान, घायवळने परदेशात जाण्यासाठी हा पासपोर्ट नेमका कसा मिळवला, याचा शोध पोलिस घेत आहेत. पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांशी या संपूर्ण प्रकरणावर पोलिस आयुक्तांची चर्चा झाली असून, लवकरच पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
पुणे येथील कोथरूड परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणी नीलेश घायवळ याच्यासह त्याच्या साथीदारांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. सध्या घायवळ परदेशात असल्याची माहिती आहे. नीलेश घायवळचे लंडन येथे एक घर असल्याची देखील माहिती आहे. नीलेश घायवळ विरोधात मकोका कारवाई जेव्हा करण्यात आली होती. त्यानंतर त्याला काही अटी आणि शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी घायवळला पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
नीलेश घायवळने पासपोर्टसाठी अर्ज करताना प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्या प्रतिज्ञापत्रात त्याने स्वतःविरुद्ध राज्यात किंवा इतर कोणत्याही परराज्यात कोणताही गुन्हा नोंदलेला नाही, असा दावा केला होता. मात्र प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचे समोर आल्यानंतर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App