विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis महाराष्ट्रात आणि देशात कुठेही मतदानाची चोरी झालेली नाही. तर राहुल गांधी यांच्या डोक्यातील चीप चोरीला गेली असल्याचा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राहुल गांधी प्रत्येक वेळी खोटे बोलून पळून जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. वास्तविक आगामी काळातील निवडणुकीत त्यांना पराजय दिसत आहे. त्यामुळे आधीच कव्हर फायरिंग साठी ते असे आरोप करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.Devendra Fadnavis
महाराष्ट्राचे निकाल पाहिल्यानंतर निवडणूक चोरीला गेल्याचा आमचा संशय निश्चित झाला असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. मशीन रीडेबल मतदार यादी न देऊन, निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करून महाराष्ट्र निवडणूक चोरली आहे याची आम्हाला खात्री पटली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.Devendra Fadnavis
निवडून येणार नाही, हे माहिती असल्यामुळेच कव्हर फायरिंग
या संदर्भात वृत्तसंस्थेशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी सतत खोटी वक्तव्य करतात आणि खोटे बोलून पळून जातात. राहुल गांधी यांना माहिती आहे की, त्यांची जमीन संपलेली आहे. त्यांना पुढील निवडणुकीत निवडून येता येणार नाही. हे माहिती असल्यामुळेच ते कव्हर फायरिंग करत आहेत. ते बिहारमध्ये देखील सत्तेवर येणार नाहीत. त्यामुळे वारंवार कव्हर फायरिंग करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.Devendra Fadnavis
मतदार यादीच्या पुनरावलोकनाला राहुल गांधींचा विरोध
मतदार यादी मध्ये प्रॉब्लेम असल्याचे तुम्ही म्हणत आहात. तर मतदार यादी पडताळणीचे काम बिहारमध्ये निवडणूक आयोगाने सुरू केले आहे. त्याला देखील तुम्ही विरोध का करता? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. मतदार यादी जर सुधारायची असेल तर ती कशी सुधारेल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मतदार यादीचे पुनरावलोकन करणे हा एकच पर्याय त्यासाठी आहे. मात्र त्याला देखील विरोध राहुल गांधी करत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
भारतामध्ये आराजकता तयार करण्याची राहुल गांधींची मानसिकता
राज्यात आणि भारतात कुठेही मतांची चोरी झाली नसल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. भारताच्या लोकशाही प्रक्रिये वरती लोकांचा विश्वास उठायला पाहिजे. भारतामध्ये आराजकता तयार झाली पाहिजे. अशा प्रकारची मानसिकता राहुल गांधींची दिसत आहे. असा आरोप देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राहुल गांधी यंत्रांनाची बदनामी करत आहेत. राहुल गांधी दरवेळी खोटे बोलून पळून जातात. राहुल गांधींच्या डोक्यातील चीप चोरीला गेली आहे. कोणत्याही मताची चोरी झालेली नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App