महाराष्ट्रातल्या महिलांचा केवळ आधार नाही, तर कॉन्फिडन्स वाढवणारे बजेट!

शिंदे फडणवीस यांचे पहिले पहिले बजेट ऐकून महिलांचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढताना दिसणार आहे. 2023-24 या सालचे स्टेट बजेट उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केले. एज्युकेशनल, गड किल्ले, फार्मास याचबरोबर महिलांसाठी उत्तम अशा योजना ते राबवणार आहेत असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वातंत्र्याच्या अमृतकाळात “पंचामृत” धोरणाची घोषणा केली. याच पंचामृत ध्येयामध्ये.. Not only the support of women in Maharashtra, but a budget that increases confidence!

– शाश्वत शेती समृद्ध शेतकरी

-महिला,आदिवासी, मागासवर्ग, ओबीसीन सह सर्व समाज घटकांचा सर्वसामावेश विकास

-भरीव भांडवली गुंतवणूक पायाभूत सुविधा विकास

– रोजगारनिर्मिती सक्षम, कुशल रोजगारक्षम युवा

-पर्यावरणपूरक विकास

ही पाच पंचावृत ही पाच पंचामृद्धी सांगितली.

त्यातच महिलांसाठी केलेल्या योजनांमध्ये लेक लाडकी योजना, सारे काही महिलांसाठी, आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ, नोकरदार महिलांसाठी 50 टक्के वसतिगृहे व दोन योजना एकत्र करून ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना अशा काही योजना आखण्यात आल्या व त्याचे इम्प्लिमेंटेशन करताना त्यांनी दिलेल्या काही डिटेलिंग बद्दल ऐकताना जाणवले, की खरंच दोन वर्षांनी स्टेट बजेट ऐकल्यासारखे वाटले. शहरातील विद्यार्थिनी म्हणून बरेच नवनवीन प्रश्नांना मी सामोरी जात असते. तर गावातील महिलांना मैत्रिणींना माझ्याही पेक्षा खडतर प्रवास करावा लागत असेल, हे जाणवते. पण यावर काय करावे हे सुचत नाही. आणि त्यावर आत्ता सध्या शिंदे-फडणवीस सरकारने काही उत्तम अशा योजना बजेटमध्ये सादर केले. व काही प्रश्नांची उत्तरे मिळाली.

लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलीला, मुलीचा जन्मानंतर खर्चासाठी 5000 ते, ती 18 वर्षाची झाल्यानंतर शिक्षण म्हणा किंवा लग्न म्हणा 75 हजार रुपये देण्याची योजना ऐकून गावातील व बेताची परिस्थिती असलेल्या कुटुंबियांसाठी ही योजना किती उपयुक्त ठरणार आहे हे लक्षात आले. तर एसटी प्रवासात 50% सूट मिळाल्यामुळे प्रवासाचा अर्धा शीण कमी होणार आहे. नवनवीन नोकऱ्या स्त्रियांसाठी उपलब्ध होणार आहेत. तसेच अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी,कुटुंबीय समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रीकरण करून केंद्राच्या मदतीने “शक्तीसदन” ही नवीन योजना मात्र फारच मनाला भावली. बलात्काऱ्याला शिक्षा होते. पण ज्या मुलीवर बलात्कार झाला आहे. तिचे सामाजिक, वैयक्तिक, कौटुंबिक आयुष्य मात्र पूर्णपणे हेलावून जाते. त्याच महिलांना आधार मिळावा यासाठी ही शक्तीसदन योजना नक्कीच उपयोगी पडेल असे वाटते. व एक विद्यार्थिनी म्हणून मलाही या बजेटमध्ये सादर झालेल्या योजनांपैकी काहींचा लाभ घेता येणार आहे यासाठी आनंदही वाटतो.

Not only the support of women in Maharashtra, but a budget that increases confidence!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात