वृत्तसंस्था
पुणे : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, लॉकडाऊनचे कडक निर्बंध लागू झाल्यापासून अडीच लाख उत्तर भारतीयांनी पुणे सोडले असून ते रेल्वेने मूळ गावी रवाना झाले आहे. North Indians say goodbye to Pune
प्रामुख्याने मजूर-कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांचा यात समावेश आहे. उत्तरेकडील गाड्याना वाढती मागणी आणि प्रतीक्षा यादीनुसार पुणे रेल्वेकडून विशेष आणि अतिरिक्त गाडय़ांचे नियोजन केले. महिनाअखेपर्यंत आणखी १५ अतिरिक्त गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतरच्या शिथिलीकरणामध्ये रेल्वेने लांब पल्ल्याच्या विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत.
१ एप्रिलपासूनच निर्बंध लागू केले. त्यामुळे गाड्यांची मागणी वाढली. आरक्षणावरच गाड्यांमध्ये प्रवेश दिला जात आहे. पुणे स्थानकावरून दानापूर (पटना), भागलपूर (बिहार), गोरखपूर, लखनौ आदी भागांत अतिरिक्त गाड्या सोडल्या १ तारखेपासून ३२ ते ३५ गाड्या या भागांत रवाना झाल्या आहेत. पुणे स्थानकातून जम्मू तावी झेलम एक्स्प्रेस, आझाद हिंदू, गोरखपूर, दामापूर, मंडुअडिहा आदी ठिकाणी दररोज गाडी धावत आहेत.
महिन्यापासून या सर्व पूर्ण क्षमतेने प्रवासी घेऊन जात आहेत. अतिरिक्त आणि विशेष गाड्या बिहार, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशकडे धावत आहेत. प्रत्येक गाडीत सुमारे १४०० आसनक्षमता आहे. त्यानुसार महिन्यात अडीच लाखांच्या आसपास नागरिक उत्तरेकडे गेले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App