सिंधूताईंची शेकडो मुलं, मुली जावई आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी त्यांच्या जाण्याची बातमी मनाला चटका लावून जाणारी आहे.No one should say that I am gone, appeal of daughter Mamta Sapkal
विशेष प्रतिनिधी
पुणे : अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचं काल रात्री रात्री ८ वाजून १० मिनीटांनी निधन झालं.पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.सिंधूताईंची मुलगी ममता सपकाळ यांच्यासह त्यांच्या नेहमी सोबत असणाऱ्या नातलगांनी रुग्णालयाच्या बाहेर हंबरडा फोडला.
सिंधूताईंची शेकडो मुलं, मुली जावई आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी त्यांच्या जाण्याची बातमी मनाला चटका लावून जाणारी आहे. याबद्दल बोलताना त्यांची कन्या ममता सपकाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.ममता यांनी बोलण्यास सुरूवात करताच माई गेल्या असं कुणीही म्हणू नका असं आवाहन केलं. कारण माई हे एक वादळ होतं, ते फक्त आता शांत झालेलं आहे.
"माई गेल्या नाही…त्या नेहमी सोबत राहतील"; सिंधूताईची लेक ममता यांच्या भावना…#sindhutaisapkal #सिंधुताई_सपकाळ #sakalnews pic.twitter.com/TSAyID8nl1 — SakalMedia (@SakalMediaNews) January 4, 2022
"माई गेल्या नाही…त्या नेहमी सोबत राहतील"; सिंधूताईची लेक ममता यांच्या भावना…#sindhutaisapkal #सिंधुताई_सपकाळ #sakalnews pic.twitter.com/TSAyID8nl1
— SakalMedia (@SakalMediaNews) January 4, 2022
ममता सपकाळ म्हणाल्या की , माईनं केलेल्या कामाच्या स्वरुपात त्या नेहमी आपल्या सोबत राहतील. त्यांनी आमच्यावर केलेले संस्कार आणि त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्या नेहमीच आमच्या सोबत राहतील असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App